गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री'

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री'

नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणांतर्गत देवी
महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना
त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे
स्थान पुन्हा मिळवून देण्यासाटी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते.
दुष्टांच्या निर्दालनासाठी देवीने अनेक अवतार घेतले.

सामान्यजनांना, विद्वानांना तिने पुन्हा सुख प्राप्त करून दिले. तिच्या या
कर्तृत्वाबद्दल तिचे स्तवन व स्मरण करण्यासाठी नवरात्र साजरे केले जाते.
एका प्रसंगात देवीनेच सांगून ठेवले आहे, *''मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर
राहीन. संकटकाळी अनन्यभावाने मला शरण येताच मी प्रकट होऊन तुम्हास दुःखमुक्त
करीन मी तुमच्यावर सदा प्रसन्न असावे म्हणून प्रत्येक अश्विन शुक्ल
प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होमहवन वगैरे प्रकारांनी माझे पूजन करावे.
माझ्यावर अचल निष्ठा ठेवून संकटसमयी जे माझी करूणा भाकतील त्यांच्या सुखासाठी
मी सदैव जपत राहीन'' *यावरून नवरात्र पाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी, असे
म्हणण्यास वाव आहे.

*नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.*

पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

या आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख आपण रोज मन माझे ग्रुप मध्ये करून घेणार आहोत

दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली
दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला
'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि
आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला
'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात
होते.

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या
पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी
तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना
निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील
मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली.
तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की
प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना
यज्ञासाठी बोलावले आहे.

परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे
मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही.
वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ
झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची
वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण
तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत
राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले.
दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दह‍ी वापरले होते. हे सर्व पाहून ती
रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले.

आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न
झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर
त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने
पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती
'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते.
'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या
जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री
दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

तुळजापूरची तुळजाभवानी

तुळजापूरची तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, नवरात्रात नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येते. नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा 21 दिवसांचा असतो.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होत असली तरीही तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. वरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते.
तुळजाभवानी मातेचे स्थान बालाघाट म्हणजेच यमुनाचलावर वसलेले आहे. संरक्षणासाठी दोन्हीकडे पारंपरिक वसाहत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर तसेच पूर्णतः खोलगट भागात असून, सुरक्षेच्या भौगोलिकदृष्ट्या तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी उताराच्या दृष्टीने जावे लागते.
मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ, तसेच अमृतकुंड म्हणजेच पूर्वीचे अंधारकुंड असे नाव प्रचलित होते. उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तुळजाभवानी मातेस पार्वतीचा अवतार समजण्यात येते. त्यामुळे गोमुख तीर्थकुंडातही महादेवाची मूर्ती आहे. त्यापाठीमागे दत्तपादुका आहेत. त्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही कार्यास सुरवात करताना गणेशदर्शन करणे हे पुराणातून सांगितले आहे.
त्यामुळे गणेशदर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य रावरंभा निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या पूर्वीच्या पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी रक्तभैरवाची मूर्ती आहे.
तुळजाभवानीचे होमकुंड सुमारे दहा फूट लांब - रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवाय देवीचा सीमोल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णतः दगडी बांधकाम केलेले आहे.
साधारण बारा फूट लांबी-रुंदीचा सीमोल्लंघन पार आहे. पारावर खोलगट सुपारीच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे आहेत. देवीच्या सीमोल्लंघन पारावर जाण्यासाठी केवळ पश्‍चिम बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. सीमोल्लंघन पाराच्या मध्यभागी पिंपळाचे प्राचीन झाड आहे. सीमोल्लंघन पारावर सूर्योदयाचा प्रकाश येतो. त्यामुळे देवीच्या मुखावर सूर्यप्रकाश येतो.
तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून, नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता, असा इतिहास सांगण्यात येतो. त्यामुळे तुळजाभवानीचे स्थान केवळ राज्य आणि दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या मर्यादित नव्हते, हे आजही स्पष्ट होते. पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यासमोरील परिसर दिसतो. त्यानंतर देवीचे मुख्य सिंहासन आहे. देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणीगृह आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपाच्या बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघराच्या स्थानात देवीचा पाळणा आणि चांदीचा पलंग आहे.
पलंगाची जागा तशी मर्यादित आहे. मात्र पलंगावर असणारी गादी भव्यदिव्य आहे. देवीसमोर भवानी शंकराची मूर्ती आहे. भवानी ही पार्वतीचे रूप आहे. भवानी शंकराच्या समोरील सभामंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केली आहे.
तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानास महत्त्व आहे. देवीच्या मंदिराकडे जाताना पुरातन ओवरीचे स्थान आहे. मंदिराप्रमाणेच खोल परिसर असून, तेथेही तीर्थकुंड आहे. या ठिकाणी आजही रहिवासी आहेत. पूर्वी तुळजाभवानीचे स्थान अनेक कडव्या धर्मविरोधकांचे लक्ष असणारे स्थान असल्याने, या ठिकाणी मंदिराप्रमाणे व तत्सम स्थान राहावे यासाठी हे स्थान निर्माण केले असून, अनेक आक्रमणांच्या वेळी देवी त्या ठिकाणी वास्तव्यास होती, असे सांगण्यात येते.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटाचा मान घटे कुटुंबीयांचा आहे. घटे कुटुंबीय मूलतः मुरूम ता. उमरगा येथील आहे. त्यांचे वास्तव्य सोलापूर - पुणे भागात आहे. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घराची पूजा होते. देवीस दररोज दोन वेळा अभिषेक पूजा कायमस्वरूपी असतात.
नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. त्यानंतर प्रशाळपूजा होते. त्यानंतर देवीस विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन आणि अजावळी आजही होमकुंडावर देण्यात येतो. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
नगरचे भगत (तेली) कुटुंबीय पालखी घेऊन येतात. सुमारे 45 पिढ्यांपासून ही प्रथा चालू आहे, असे सांगण्यात येते. भिगारच्या पलंगावर देवीची पाच दिवस निद्रा असते. सार्वत्रिक सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानी निद्रेत असते. त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा होते.
आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दाने मातृत्वभावनेने दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहल्याबाई होळकरांची पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या रावबहादूर संस्थानचे कार्य कोल्हापूरच्या राजे छत्रपतीचे देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी अशी अनेक नावे आहेत. आता शहरात नवीन विकास योजनेचे पर्व पुढे येऊ घातले आहे.
तीनशे 15 कोटी रुपयांचा दमदार आराखडा मंजूर केला आहे. आता ही विकासाची कामे कोणत्या प्रकारे गतीने होतात, त्याकडे लक्ष लागले आहे. आराखड्यापूर्वी सरकारने प्राधिकरण केले असून, त्यासाठी सध्या सरकारी पातळीवर नियोजन चालू आहे. राज्यात तुळजाभवानी माता हे पहिले पूर्णपीठ आहे. याशिवाय माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ आहे. देवी ही सौदर्यवाहिनी आहे. भाळी गंध त्यावर सुवर्णअलंकाराने घातलेला चोप, गळ्यात वेगवेगळे दागदागिने यामुळे तुळजाभवानीचे रूप भाविकांना मोहून टाकते.

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

*गणपतीच्या २१ मूर्ती*

*गणपतीची २१ नावं*

आपल्या भारतीय संस्कृतीत गणपतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपती हे अति
प्राचीन दैवत आहे, वैदिक देव आहे, आदिदेव आहे. कोणत्याही शुभकार्यारंभी
अग्रपूजेचा प्रथम मान गणपतीलाच मिळाला आहे. श्रीगणेश हा सुख देणारा, दु:ख हरण
करणारा, दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना आनंद देणारा, कोट्यवधी लोकांचं
श्रद्धास्थान असलेला देव आहे. दरवषीर् कोट्यवधी लोक अष्टविनायकांचं, साडेतीन
पिठांचं आणि पुराणोक्त गणेशाचं मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. त्या
गणरायांच्या २१ नाव, रूप, त्याला आवडणारी फुलं, फळं, नैवेद्य आदींविषयी...

...........

*महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणपती*

१. मयुरेश्वर-मोरगाव, पुणे, २. सिद्धिविनायक-सिद्धटेक, अहमदनगर, ३.
बल्लाळेश्वर-पाली, रायगड, ४. वरद विनायक-महाड, रायगड, ५. चिंतामणी-थेऊर, पुणे,
६. गिरिजात्मक-लेण्यादी, पुणे, ७. विघ्नेश्वर-ओझर, पुणे ८. श्री
महागणपती-रांजणगाव, पुणे, ९. मंगलमूतीर्-चिंचवड, पुणे, १०. कसबा गणपती-पुणे,
११. सिद्धिविनायक-सारसबाग, पुणे, १२. गणेश-कढाव, रायगड, १३. टिटवाळा-महागणती-
ठाणे, १४. पुळ्याचा गणपती-रत्नागिरी, १५. हेदवीचा दशभुज-रत्नागिरी, १६.
वक्रतुंड-आवास, रायगड, १७. मोदकेश्वर-नाशिक, १८. मुद्गल गणेश-परभणी. १९.
चिंतामणी-कळंब, यवतमाळ, २०. श्रीसिद्धिविनायक-प्रभादेवी, २१. श्री
सिद्धिविनायक-सीताबडीर्, नागपूर.

*देशातील प्रसिद्ध २१ गणपती*

ॐकार गणेश-प्रयाग, महोत्कट-काश्मीर, विघ्नराज-आंध्र प्रदेश, श्वेता गणेश-केरळ,
गणेशजी-बंगाल, मंगलमूतीर्-मध्य प्रदेश, ढुंढीराज-काशी, बदरी गणेश-हिमालय, गणेश
बर्फ लिंग-हिमालय, नरक विमोचन गणेश-आसाम, ब्रह्मागणेश-बिहार, सीतामढीचा
गणेश-बिहार, षड्भूज गणेश-पंजाब, बली गणपती-राजस्थान, दुर्गकूट गणेश-गुजराथ,
पंचमुखी गणेश-मध्य प्रदेश, खांडोळ्याचा गणेश-गोवरा, गोकर्णाचा गणेश-कर्नाटक,
भदाचलम गणेश- आंध्र, कावेरीकांत विनायक- मदास, कल्पगणपती- ओरिसा.

*जगातील प्रसिद्ध २१ गणपती*

पंचगणपती, नृत्यगणपती, सोळा हातांचा गणपती आणि हेरंब गणेश-नेपाळ,
गणेश-कंबोडिया, द्वारपाल गणेश-तिबेट, महापियेन गणेश-ब्रह्मादेश, गुढविद्या
गणेश-चीन, गणेशमूतीर्-मेक्सिको, गणेश-तुर्कस्तान, गणेश- सिलोन, गणपती-बानिर्ओ,
गणेश-अफगाणिस्तान, गणपती-बाली बेट, बोरीचा गणपती-इण्डोनेशिया, गणेश-जावा, लेखक
गणेश-सयाम, गुरू गणेश-कंबोडिया, गणपती-रोम, इटली, श्री गणेश-जपान, योद्धा गणेश-
इराण.

*गणपतीला आवडणाऱ्या २१ वस्तू*

१) मोदक, २) नारळ, ३) चंदकोर, ४) ओम् ५) खेटव, ६) स्वस्तिक, ७) एकदंत, ८)
विडासुपारी, ९) दूर्वा, १०) नागबंद, ११) मुद्गर, १२) शूल, १३) खट्वाग, १४)
परशु, १५) पाश, १६) मोर, १७) अनंत फूल, १८) अंकुश, १९) कमळ, २०) उंदीर, २१)
केवडा.

*गणपतीची २१ नावं*

१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष. ४ गजवक्र, ५. लंबोदर, ६. विकट, ७.
विघ्नराजेंद, ८. धुम्रवर्ण, ९. भालचंद, १०. विनायक, ११. गणपती, १२. गजानन, १३.
ओंकार, १४. मयुरेश्वर, १५. धुम्रकेत, १६. महोदर, १७. विघ्नराज, १८.
ब्रह्माणस्पती, १९, जगदीश, २०. श्रीगणेश, २१. अदिदेव.

*पूजेसाठी २१ पानं*

दुर्वा, मधुमालती, बोर, माका, बेल, धोतरा, आघाडा, तुळस, डोलरी, कण्हेरी, शमी,
अर्जुन, रुई, विष्णुकांत, जाई, डाळींब, देवदार, केवडा, मारवा, पिंपळ, अगस्ती.

*२१ फुलं*

जास्वंदी, पांढरं कमळ, तांबडं कमळ, जाई, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ,
उंडी, सुपारी, नागकेशर, मोगरा, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, चवई, नांदुरकी,
गोविंद, मोहोर, शतपत्र.

*२१ पुराणं*

गणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्मावैवर्त पुराण, अग्नि पुराण, पद्म पुराण,
पद्म पुराण उत्तर, नारद पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, लिंंग पुराण उत्तरार्ध,
वराह पुराण, वराह पुराण उत्तरार्ध, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण,
ब्रह्माांड पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण ब्रह्माखंड, स्कंद पुराण
अवंतीखंड, स्कंद पुराण प्रभासखंड.

*ठार मारलेले २१ राक्षस*

नारांतक, देवांतक, मधु, कैटभ, त्रिपुरासूर, सिंदुरासूर, व्यामोसूर, लोभासूर,
मोहासूर, मदासूर, कमलासूर, विघ्नासूर, मत्सरासूर, देभासूर, अनसासूर, क्रोधासूर,
मायासूर, कामासूर, मेषासूर, मलकासूर.

*गणपतीच्या २१ मूर्ती*

१. बाल गणपती, २. तरुण गणपती, ३. भक्ति विघ्नेश्वर, ४ वीरू-विघ्नेश, ५. शक्ति
गणेश. ६. लक्ष्मी-गणपती, ७. उच्छिष्ट गणपती, ८. महागणपती, ९. उर्ध्व गणपती, १०.
पिंगळा गणपती, ११. हेरंब गणपती, १२. प्रसन्न गणपती, १३. ध्वज गणपती, १४.
उन्मत-उच्छिष्ट गणपती, १५. विघ्नराज, १६. भुवनेश गणपती, १७. नृत्य गणपती, १८.
हरिदा गणपती, १९ भालचंद, २०. शर्पकर्ण, २१ एकदंत.

गुरुवार, २८ जुलै, २०११

किती छान दिसतय सगळं ईथून

मी बोलत राहिलो हुरळून.. सांगत राहिलो,
"किती छान दिसतय सगळं ईथून
ते दूरवर पसरलेले डोंगर.. गर्द हिरवे आच्छादन
नुकतीच दवात न्हावून निघालेली पाने
त्या तळयाचं निळशार पाणी.. लाजरे तरंग त्यावर
मुक्तपणे आकाशात विहार करणारे पक्षी
सगळं कस मनमोहक.. आल्हाददायक..."
तु तेंव्हाच स्तब्ध निर्विकार स्वरात उत्तरलीस,
"किती ओसाड दिसतय आजूबाजूला,
दूरवर कोणीच कस नाहिये.. कुठेच..
पारदर्शकता कमी झालीये बघ पाण्याची.
पाऊसही जरा प्रमाणात पडायला हवा,
हे काय.. जिकडे तिकडे चिक चिक नुसती..
जरा पाय ठेवायला जागा नाही कुठेच.
ह्यालाच का निसर्ग निसर्ग म्हणून डोक्यावर घ्यायचं."
मी चित्राकडे बोट करत विचारलं,
"ईकडेच पहाते आहेस ना तु?"
तुझं स्वयंचलित उत्तर लगेच आलं,
"एवढं महागड तिकिट काढून आलो ना प्रदर्शनाला,
मग दुसरे कुठे बघणार मी? मोजमापच नाही कुठल्या गोष्टीला,
ना पावसाला, ना चित्राला, ना काढणार्‍याच्या वेळेला, ना तिकिटाला."

शुक्रवार, १५ जुलै, २०११

बल्लाळेश्वर | पाली

श्रीबल्लाळेश्वराचे देऊळ फारच मनोहर आहे. त्याचे तोंड पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सूर्वोदय होताच सूर्याची कोवळी सोनेरी किरणे बरोबर देवाच्या मूर्तीवर पडतात. त्यावेळी तिथले वातावरण अगदी पवित्र आणि प्रसन्न असे एखाद्या नास्तिकालाही वाटते. मंदिराचे बांधकाम अगदी चिरेबंदी आहे. शिशाचा रस ओतून भिंती अगदी मजबूत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे बांधकाम एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणेच झालेले आहे.

मंदिराचा मुख्य गाभारा पंधरा फूट उंच आहे. तो उंदीर गणपतीकडे पहाणारा आहे. मंदिराबाहेरच्चा सभामंडप चाळीस फूट लांबीचा आणि वीस पूट रुंदीचा आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये नक्षीकाम केलेले अगदी मखर आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला दोन तलाव आहेत. त्यावर घाट बांधलेले आहेत. तलाव सदोदित पाण्याने भरलेले असतात. परंतु तलावातले पाणी मात्र स्वच्छ नाही आणि पिण्याजोगे तर बिलकूल नाही. बाहेरच्या कमानीत एक मोठी थोरली घंटा आहे. ती पाहिल्यावर नाशिकच्या नारोशंकरी घंटेची आठवण होते. ही घंटा चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकला त्यावेळी जी लुटालुट झाली, त्यात मिळाली आणि ती मग पेशव्यांनी ह्या देवस्थानाला अर्पण केली असे म्हणतात.

मोरोबा दादा फडणीस यांचे वडील बाबुराव फडणीस यांनी हे देवालय बांधले आणि त्यासाठी नेमणूक करून दिली. त्याचवेळी त्यांनी धर्मशाळा आणि मठही बांधला.

जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानाची फार ख्याती आहे. जुन्या काळू ह्या देवालानवसाचे आततायी प्रकार केले जात असे म्हणतात. त्या प्रकारापैकी आपली जाभ कापून देवाला अर्पण करण्याचा एक प्रकार होता.

अशी एक घटना १७४४/४५ साली पडल्याची नोंद इतिहासात सापडते. ती खबर केली आणि मंदिराची शुद्धि करून घेतली.

१७५३/५४ साली खुद्द पेशव्यांनी श्रीबल्लाळेश्वरावर अभिषेक केला व अनुष्ठान करविले. ह्याबाबत ऐतिहासिक पेशवे दप्तरात एक नोंद आढळून येते.

गाभाऱ्यात श्रीबल्लाळ विनायकाची मूर्ती आहे. तिची उंची तीन फूट आहे. कपाळाचा भाग खोलगट तर बाकीचा चेहरा स्पष्ट असा आहे. सोंड डावीकडे वळलेली आहे. बेंबीमध्ये आणि डोळ्यांमध्ये दैदिप्यमान हिरे बसविलेले आहेत. देवाची मूर्ती दगडी सिंहासनावर विराजमान झालेली आहे. सिंहासन मूर्तीच्या सभोवती जडविलेले आहे. मूर्तीच्या बेंबीपासूनचा भाग सिंहासनाच्यावर दिसून येतो. देवाच्या जवळ ऋद्धिसिद्धि उभ्या आहेत.

कृपयुगामध्ये पल्लीपूर ह्या नगरात, कल्याणशेट ह्या नावाचा एक व्यापारी रहात असे. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. पोटी मूलबाळ नसल्यमुळे इंदुमतीने श्रीगणपतीची उपासना सुरू केली. काहीकाळाने, तिला दिवस गेले. आणि तिला मुलगा झाला.

त्या आपल्या मुलाचे नाव तिने ‘बल्लाळ’ ठेवले. बल्लाळ लहानाचा मोठा होऊ लागला. परंतु त्याला श्रीगणपतीच्या चिंतनावाचून दुसरे काहीच सूचत नव्हते. रात्रंदिवस तॊ आपल्या देवाचे चिंतन करीत राहिला. त्याच्या संगतीत राहिलेली गावातली मुलेही श्रीगणपतीची उपासना करू लागली. ती मुलेसुद्धा सदोदित गणपतीचे चिंतन करीत राहिली. मग काय? बल्लळाची संगत धरल्यामुळे गावातील मुले बिघडून गेली अशी ओरड सुरू झाली. त्या मुलांच्या पलकांनी बल्लाळच्या पित्याजवळ आपली तक्रार निवेदन केली. कल्याणशेटी आपल्या मुलाला रागे भरला. त्याने बल्लाळच्या पुढ्यातली मूर्ती उथळून टाकली आणि त्याला भरपूर मार दिला. “तू असा वेडेपणा करू नकोस आणि गावातल्या मुलांना बिघडवू नकोस” असाही त्याला दम दिला.

बेदम मार खाल्ल्यामुळे, बल्लाळ बेशुद्ध झाला. श्रीगणपती हे त्याचे दैवत. त्याच्या दैवताला दया आली. दैवत प्रसन्न झाले आणि अक्ताला अभय दिले.

बल्लाळला पावलेला हा गणपती म्हणून बल्लाळेश्वर.

ह्याच देवळाच्या मागच्या बाजूला दुसरे एक देऊळ आहे. ते श्रीधुंडीविनायकाचे देऊळ म्हणून प्रख्यात आहे. श्रीधुंडीविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. पूर्वी बाळबल्लाळ हा रानात, एका गणपतीच्या मूर्तीच्या भजनपूजनात निमग्न असताना त्याचे पिताजी कल्याणशेटी तेथे आले. आणि त्यांनी त्याच्या पुढ्यातली मूर्ती उधळून लावली. जी मूर्ती उधळून लावली तीच ही मूर्ती होय. श्रीधुंडीविनायकाची कथा ही अशी आहे. दर्शन आणि पूजा अर्चा करताना, प्रथम ह्या श्रीधुंडीविनायकाला अग्रमान दिला जातो. आणि नंतर श्रीबल्लाळेश्वराचे दर्शन वगैरे, अशी प्रथा आहे.

पालीचा बल्लाळेश्वर । शमीतळीशिवकुमार

अज्ञभक्ताचा कैवार । तोच येईल सर्वदा ॥

गिरिजत्मज | लेण्याद्री

लेण्याद्री हा डोंगर जुन्नरच्या उत्तरेला आहे. ह्या डोंगराजवळ जाण्यासाठी मार्गातील कुकडी नदी पार करून जावे लागते. गावापासून हा डोंगर मैल-दीड मैल अंतरावर आहे.

पावसाळ्यात कुकडी नदी अगदी दुधडी भरून वाहात असते. त्यावेळी डोंगरावरील श्रीगणपतीच्या दर्शनाला जाणे केवळ अशक्यप्राय ठरते.

डोंगरावरील लेणी फारच सुंदर आहेत. ह्या देवालयाच्या सभामंडपाची उंची फार कमी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापुढील सभामंडप बराच मोठा आहे. त्यात कोरलेले पाषाणाचे सहा खांब असलेले दिसतात. मुख्य गाभारा बराचसा आतल्या बाजूला आहे आणि तेथे बराच अंधार आहे.

ह्याच डोंगरातील एका गुहेमध्ये पार्वतीने तपश्चर्या केली. श्री विनायक तेथे प्रगट झाले तेव्हा तिने तिथे श्री विनायकाची प्रतिष्ठपना केली. परंतु ती जागा अतिशय अवघड अशा जागी आहे. त्यामुळे तेथे जाऊन त्या गणपतीचे दर्शन घेण्याचे काम महाकर्म कठीण ठरते.

असे सांगतात की, इतिहासकाळात एकदा नाना फडणविसांनी त्या बिकट जागेवर असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना दृष्टांत झाला आणि त्यामुळे तो आपला प्रयत्न त्यांना सोडून द्यावा लागला.

देवालयात गणपतीची स्वतंत्र अशी मूर्ती नाही. परंतु लेण्यातील एका भिंतीवर गणपतीचे बालरूप खोदून ठेवलेले आढळते.

लेण्याद्रि गणपती तो हाच !

ह्या गणपतीसंबंधीची पुराणातली कथा अशी -

देवी पार्वती एकदा लेण्याद्रीच्या गुहेत बसलेली असताना गणपती आपला पुत्र व्हावा असे तिला वाटले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिने मातीची गणेशमूर्ती तयार केली आणि त्या मातीच्या मूर्तीचे ती चिंतन करू लागली. मग काय ?

मातीची मूर्ती सजीव झाली.

दिव्य तेजस्वी असा तो गणपती तिच्या पुढे आला. परंतु पार्वती आपल्या चिंतनात मग्न झाली होती. त्याने तिला जागे केले. पार्वती धन्य झाली.

गणपतीने तेथेच वास्तव्य केले.

अनेक लीला करून दाखविल्य.

अनेक राक्षसांना गणपतीने नायनाट केला.

पार्वती म्हणजेच गिरिजा.

त्या गिरिजेचा हा आत्मज म्हणून गिरिजात्मज

लेण्याद्रिच्या कडेकपारी । गिरिजात्मज तो वास करी ।

मातेसाठी मिरीकुहरी । पार्थिव देवत्व पावले ॥

विघ्नेश्वर | ओझर

जुन्नरला जाताना सुमारे चार फर्लांगावर उजव्या बाजूस ओझर गावाकडे जायला फाटा फुटतो. देवस्थानाकडे जयला कुकडी नदी पार करून जावे लागते.

श्री विघ्नेश्वराचे देवालय पूर्व दिशेकडे तोंड करून उभे आहे. देवालय चारही बाजूंनी दगडी तटाने बंदिस्त करून टाकलेले आहे. ह्या दगडी तटावरून चालण्यासाठी पायवाटही आहे.

देवाच्या मूर्तीसमोर दहा फुटी ऐसपैस मंडप आहे. मंडपाच्या दारातून बाहेर पडले की काळ्या पाषाणाला उंदीर आहे. ह्या मंडपाला लागूनच दुसरा ऐसपैस असा सभामंडप आहे. त्यापुढे आणखीन एक दहा फुटाचा सभामंडप आहे. त्याच्यापुढे दगडी फरशीचे विस्तृत पटांगण आहे. ह्या पटांगणात दोन दीपमाळा उभ्या आहेत.
देवळाचा चुमट मोठा कलाकुसरीचा आहे. त्यावर शिखर आणि सोनेरी कळस आहे.

देवालयाचा परिसर फारच रमणीय आहे. देवालयाच्या मंदिरावरील शिखर चिमाजी अप्पांनी बांधले. वसईचा किल्ला जिंकून परत येत असतानाच, चिमाजी अप्पांनीह्या देवालयाचा जीर्णोद्धार करविला.

श्रीमंत बाजीराव पेशवे हे देखील ह या विघ्नेश्वराचे महान भक्त होते. ह्या विघ्नेश्वरासंबंधी जी कथा सांगतात ती अशी -

एकदा इंद्राचा दरबार चालू असताना, तेथे नारदमुनीची स्वारी प्रगट झाली. त्यानी इंद्राला असे निवेदन केली की, “हिमालयावर अभिनंदन नावाच्या राजाने यज्ञसंभारभ मांडला आहे. त्या यज्ञात अभिनंदनाने, तुझा हविर्भाग तुला देऊ केला नाही. आणि अशाप्रकारे त्याने तुझा अपमान केलाआहे. हा असा अपमान तू का सहन करावास?” अपमान झाल्याचे कळताच इंद्र खूप संतापला. काळ नावाच्या राक्षसाला विघ्नासूर असे नाव इंद्राने दिले. आणि त्याच्याकडून त्या राजाच्या यज्ञाला विघ्न आणले. साऱ्या देवांमध्ये घबराट पसरला. सर्व देवांनी श्रीगणपतीची प्रार्थना केली.

श्रीगणपती पार्श्व ऋषींचा पुत्र बनला आणि त्याने विघ्नासुराशी युद्ध आरंभले. त्या युद्धात गणपतीने विघ्नासुराचा पाडाव केला. विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गनपतीने त्याला अभय दिले.आणि त्याच्याच विनंतीवरून गणपतीने, ‘विघ्नेश्वर’ हे नाव धारण केले. देवांनी भाद्रपद शुद्ध ४ ला, ओझरगावी गणपतीची स्थापना केली. तेव्हापासूनच ह्या देवाचे नाव विघ्नेश्वर असे पडले.

ह्या देवालयातील विघ्नेश्वराची मूर्ती पूर्णाकृती आहे. देवाने मांडी घातलेली आहे. सोंड डावीकडे आहे. डोळ्यांत दोन माणके बसविली आहेत. कपाळावर हिरा बसविला आहे. आणि बेंबीत खडा आहे.

ओझरगावी विघ्नेश्वर । जये मारिला विघ्नासूर

तो मी नमिला रूपसुंदर । पिगलाक्ष गजानन ॥

महागणपति | रांजणगाव

पुणे अहमदनगर मार्गावर, पुणे जिल्ह्यात, शिरूर तालुक्यात रांजणगाव आहे. इथले देवालय पूर्वेकडे तोंड करून उभे आहे. ह्या देवालयाची रचना अशी केलेली आहे की, उत्तरायन अथवा दक्षिणायन याच्या मध्यकालात, सूर्याचे किरण नेमके ह्या देवाच्या मूर्तीवरच पडत असतात.

देवालयातील सभामंडप इंदोरचे सरदार किबे यांनी बांधलेला आहे. पेशव्यांच्या पदरी असलेले सरदार पवार आणि सरदार शिंदे यांनी येथील ओवऱ्या बांधलेल्या आहेत. देवालयाच्या आतीलमूर्तीचा गाभारा आणि बाहेरील गाभारा श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बांधलेला आहे.

देवालयाटील पूजामूर्तीच्या खाली तळघरात एक लहानशी मूर्ती आहे. तीच खरी श्रीची मूर्ती आणि मूळं मूर्ती. परधर्मीयांच्या हल्ल्याच्या भीतीमुळे, मूळ मूर्ती अशा प्रकारे लपवून ठेवण्यात आल्याचे सांगतात. त्या मूर्तीला दहा सोंडा आणि वीस हात आहेत असे म्हणतात. ती मूर्ती अगदी क्वचित्‌ प्रसंगीच बाहेर काढण्यात येते. या मूर्तीचे ध्यानाला. “महागणपतीचे ध्यान” म्हणतात. “महोत्कट” असे ह्या गणपतीचे नाव आहे. असे सांगतात की अशाच ध्यानाची दुसरी एक मूर्ती, पेशवाईतील प्रसिद्ध कारभारी हरिपंत तात्या फडके यांच्या वंशजाकडे त्यांच्या पुण्याच्या वाड्यात ठेवलेली आहे.

ह्या देवालयाच्या नजीकच अशी एक विहीर आहे की, त्या विहिरीचे पाणी दुष्काळतही कधी आटत नाही.

देवालयातील महागणप्ती हा डाव्या सोंडेचा आहे. देवाने मांडी घातली आहे. मूर्ती मनोहर आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऋद्धिसिद्धि ह्या दोघी उभ्या आहेत.

कथा अशी -

श्रीगणपति एकदा प्रसन्न झाला आणि त्याने त्रिपुरासुराला वर दिला. पण त्यामुळे तो असुर मस्त बनला आणि त्याने चहूबाजूला पुंडाई करायला सुरवात केली. देवांचा राजा इंद्र याला ढवलून ती स्वतःच त्या इंद्राच्या सिंहासनावर बसला. कैलासावर बसलेल्या श्रीशंकराला त्याने सळो की पळो करून सोडले. सगळीकडे असुरांचाच वरचष्म. देवांना कुणीच विचारीना जीवन अगदी असह्य होऊन गेले. श्रीशंकराला बरोबर घेऊन सर्व देव श्रीगणपतीला शरण गेले. गणपतीची आराधना करण्यासाठी नारदांनी आठ श्लोकांची गणेशस्तुती देवांना सांगितली. नारदकृत संकटनाशक स्तोत्र ते हेच!

“प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं ।

भक्तावासं स्मरेन्नित्यमायुः कामार्थसिद्धये ॥”

श्रीगणपति प्रसन्न झला. त्याने वर दिला.

देव-दैत्यांचे घनघोर युद्ध झाले.

त्या युद्धात त्रिपुरासुर मारला गेला.

दैत्यसैन्याचा पुरा निःपात झाला.

सर्वत्र आनंदी आनंद झाला.

मणिपूर नावाचे गाव वसविले. तेच आजचे रांजणगाव.

रांजणगावी गणपती । यशद झाला पित्याप्रती ॥

त्रिपुराची करी समाप्ती । शिव ज्याच्या प्रभावे ॥

महाराष्ट्री अष्टविनायक । त्याचे पायी नतमस्तक

होऊनिया ग्रंथलेखक । देशभाषा बोलतो ॥

सिद्धिविनायक | सिद्धटेक

भीमा नदीच्या काठचे सिद्धटेक हे अगदी जंगलभागात आहे. ते एक लहानसे कुग्राम आहे. तेथे जाण्यासाठी पक्की सडक नाही. जवलपास कुठे रेल्वेमार्गही नाही. ह्या गावात अजूनही बिजलीची सोय झालेली नसल्यामुळे कंदिलाच्या प्रकाशातच आपले सारे व्यवहार उरकावे लागतात.

श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमुख असे आहे. वेशीपासून मंदिरापर्यंत सरदार हरिपंत फडके यांनी बांधलेला फरशीचा मार्ग आहे. मंदिरातील गाभारा पंधरा फूट लांबीचा आणि दहा फूट रुंदीचा असा आहे. देवाचे मखर पितळेच असूनदोन्ही बाजूला जयविजय उभे आहेत. मधला गाभारा इंदूरच्या अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे.

सिंहासन पाषाणाचे आहे. गाभाऱ्यातच देवाचे शेजघर आहे. बाहेरच्या बाजूला खुला सभामंडप आहे. पुढच्या बाजूला महाद्वार आणि त्यावर नगारखाना आहे. सकाळ, दुपार येथे चौघडा वाजत असतो. पेशवाईतले सरसेनापती हरिपंत फडके यांच्या स्मरणार्थ हा चौघडा वाजतो. त्यासाठी दरवर्षी सहाशे रुपयांचे वेतन कर्जतच्या ट्रेझरीतून दिले जाते. मंदिराच्या डाव्या बाजूला भीमा नदी ही दक्षिणेला वाह्ट असते. भीमानदीवर हरिपंत फडके यांनी घाट बांधला आहे. आणि तेथेच त्यांची समाधी आहे.

श्रीसिद्धिविनायकाची तीन फूट उंचीची मूर्ती ही स्वयंभू आहे. रुंदी अडीच फूट आहे. मूर्तीचे तोंड उत्तर दिशेला आहे.मूर्तीची सोंड ही उजव्या बाजूला वळलेली आहे. मांडी घातलेली आहे आणि मांडीवर ऋद्धिसिद्धि ह्या दोघी बसलेल्या आहेत. येथे देवाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत बरीच रूढ आहे.

मंदिराच्या पश्चिम बाजूला श्रीशिवाई देवीचे आणि महादेवाचे देऊळ आहे. त्याच बाजूला श्री. काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ एक धर्मशाळा बांधलेली आहे.

प्राचीन काली मधु आणि कैटम अशा दोन राक्षसांनी सर्वांना अगदी त्राही भगवान करून सोडले होते. त्या दोन राक्षसांना निःपात करायला हवा होता. ते काम श्रीशंकराने शईविष्णूवर सोपविले. श्रीविष्णूने त्यासाठी श्रीगणेशाची सुद्धा उपासना करायला हवी होती. तशी उपासना करण्यासाठी एखाद्या सुयोग्य स्थळाची शोधाशोध करीत असताना श्रीविष्णु हा एका टेकडीवर येऊन पोचला. आणि त्या टेकडीवरच त्याने, ‘श्रीगणेशायनमः’ असा मंत्र म्हणत तपश्चर्या करावयाला आरंभ केला. श्रीविनायक विष्णुला प्रसन्न झाला आणि त्या दोन दैत्यांशी युद्ध करताना तुला विजय प्राप्त होईल असा अशिर्वाद त्याला दिला. श्रीविष्णूकडून त्या दैत्यांचा निःपात झाला. इथेच श्रीविष्णूला सिद्धी प्राप्त झाली. म्हणूनच ह्या स्थळाला सिद्धक्षेत्र अथवा सिद्धटेक हे नाव मिळाले. टेकडीवर देवालय उभारण्यात आले. आणि तेथे गंडकी शिलेची श्रीविनायकाची मूर्ती स्थापन करण्यात आली.

काही काळानंतर ते देवालय लुप्त झाले आणि तेथे टेकडीच उरली. त्या टेकडीवर गावातली गुरे चरण्यासाठी येऊ लागली. एक दिवस मोठा चमत्कार घडून आला. त्या टेकडीवर श्रीगजान प्रगट झालेले गुराख्यांना दिसून आले. मग काय ? गुराख्यांना फार आनंद झाला. ते गुराखी नित्यनेमाने भीमानदीवर स्नान करून बरोबर आनलेल्या शिदोरीचा त्या देवाला नैवेद्य दाखवू लागले.

नैवेद्य दाखवल्यानंतर मगच ते आपली कांदाभाकर खाऊ लागले. असा हा क्रम बरेच दिवस चालू होता. एक दिवस एका गुराख्याला दृष्टांत झाला. श्रीगजाननाने त्याला स्वप्नात येऊन सांगितलेकी, “गुराख्याने आज्ञा प्रमाण मानली. पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून तो त्या देवाची पूजाअर्चा घू लागल. त्याच्याकडूनच आरती आणि नैवेद्य करवून घेऊ लागला.

भीमानदीच्या काठी, महर्षी व्यासांनी मोठा यज्ञ केला होता. ते स्थान येथून जवळच आहे. नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडते त्यावेळी त्या यज्ञातील भस्म अजूनही दृष्टीस पडते.

शई सिद्धि विनायकाचे अत्यंत जागृत असे हे स्थान आहे.

सिद्धटेकी विनायक ।

सिद्धिदाता विघ्ननाशक ।

विष्णूही ज्याचा पूजक ।

त्यासि वंदन आदरे ॥

चिंतामणि | थेऊर

मोटार-थांब्यापासून अवघ्या एका फर्लांगावरच श्रीचिंतामणीचे देवालय आहे. देवालयाचे महाद्वार उत्तराभिमुख आहे. चिंचवडचे मोरया गोसावी यांचे वंशज श्री चिंतामणि देव यांनीच हे देवालय बांधले. त्यानंतर साधारण शंभर एक वर्षांनी, श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी सभामंडप बांधला आणि ह्या देवालयाचा विस्तार केला. नंतर पेशव्यांचे सेनापतीहरिपंत फडके आणखी इतर भक्तमंडळीनी मिळून ह्या देवालयात काही फेरफार करून त्याची भव्यता आणि शोभा अधिक वाढविली.

देवालयाच्या आवाराबाहेर जवळच पेशव्यांचा वाडा होता. परंतु तो वाडा आता तेथे उभा नाही. मुख्य दिंडीदरवाजाचे काही अवशेष मात्र अजूनही शिल्लक आहेत. वाड्याचे आवार बरेच भव्य दिसते. तेथील भव्य अवशेषांवरून त्या वाड्याच्या पूर्वीच्या भव्यतेची कल्पना येते. ह्या वाड्यापासून थेट नदीपर्यंतची फसरबंदी वाट पेशव्यांनी बांधून काढली होती. ही फरसबंदी वाट मात्र अजूनही सुस्थितीत राहिलेली आहे.

थेऊर गावाच्या तिन्ही बाजूला मुळमुठा नदीचा जणू काय वेडा पडलेला आहे. मुळामुठा नदीला अगदी बारमास, उदंड पाणी असते. त्यामुळे थेऊरला पाण्याची कधीच पंचाईत पडत नाही. नदीच्या डोहाला कदंबतीर्थ अथवा चिंतामणि तीर्थ असे नाव आहे.

श्रीचिंतामणि हा डाव्या सोंडेचा गनपती आहे. मांडी घातलेले आसन आहे. मूर्ती अगदी रेखीव आहे. मूर्तीचे तोंड पूर्व दिशेला आहे.

गौतम ऋषीच्या अहिल्येची देवांचा इंद्र यान फसवणूक केली व आपली कामेच्छा पुरी केली. गौतम ऋषींना हीगोष्ट कळताच त्यांनी अहिल्याआणि इंद्र अशा दोघांनाही शाप दिला. अहिल्या शिळा होऊन पडली आणि इंद्राच्या अंगाला क्षते पडली. सर्व देवांना फार दुःख झाले. त्यांनी त्या शापाबद्दल गौतमऋषीची विनवणी केली. गौतम ऋषींनी मग उःशाप दिला. श्रीगजाननाची आराधना केल्याने तुझ्या पापाचे क्षालन होईल असे त्याला सांगितले. बृहस्पतींनी इंद्राला गणेशमंत्र दिला. इंद्राच्या आराधनेमुळे श्रीगजानन प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यामुळे इंद्राचे रूप पालटले आणि तो पुन्हा पूर्ववत दिसू लागला.

हा गणपती, आपल्या मनात चितिलेले देतो म्हणून याचे नाव चिंतामणि असे पडले.

ह्या क्षेत्रासंबंधी दुसरी एक कथा सांगण्यात येते ती अशी -

ब्रह्मदेवाने आपल्या चित्ताला स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून चित्तवृत्तीचा प्रकाशक चिंतामणि याची आराधना केली. चिंतामणि प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर दिला. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या चित्ताला स्थैर्य लाभले. ह्या प्रसंगाचे स्मारक म्हणून हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. येथे साधकांच्या मोहजालाचे निराकरण होते. आणि त्यांना चित्तशांती लाभते.

योगसिद्धीचा लाभ होतो. आणि आत्मसाक्षात्कारही होतो.

याच क्षेत्रात कौडिण्य ऋषींचा आश्रम होता. मोरया गोसावी यांनी सुद्धा येथील अरण्यात उग्र तपश्चर्या केली. याच ठिकाणी त्यांनी त्यांना सिद्धि प्राप्त झाली होती. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची पत्नई रमाबाई ह्यांच्या येथील वास्तव्यामुळे ह्या क्षेत्राला विशेष महत्त्व आले.

पेशव्यांचे दैवत गणपती. परंतु श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यंची ह्या श्री चिंतामणीवर विशेष भक्ति होती. राज्यकारभारातून थोडीशी जरी फुरसत मिळाली तरी विश्रांतीसाठी आणि मनःस्वास्थ्यासाठी, ते थेऊर येथील आपल्या वाड्यात येऊन रहात. ह्या चिंतामणीच्या सान्निध्यात राहूनच त्यांनी आपल्या अंगातील राजयक्ष्मा ह्या रोगाशी सामना दिला. आणि आपले प्राण त्यांनी शेवटी, श्रीचिंतामणीच्याच चरणावर अर्पण केले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई ह्या त्यांच्याबरोबरच सति गेल्या. मुळामुठा नदीच्या काठावर सतीचे वृंदावन आहे. कार्तिक वद्य ८ला दरवर्षी तेथे रमामाधव पुण्यतिथीला उत्सव साजरा केला जातो.

देवालयाच्या एका ओवरीमध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे तैलचित्र लावलेले आढळते.

थेऊरला ह्या श्री चिंतामणीचा उत्सव दरवर्षी, भाद्रपदातल्या चतुर्थीला फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

थेऊर गावी चिंतामणि । देवेंद्रा जो वरदपाणी ।

गौतमाची शापवाणी । ज्याच्या कृपें आटली

मोरेश्वर | मोरगाव

ह्या देवळाच्या सभोवताली त्याच्या संरक्षणार्थ पक्का तट बांधण्यात आलेला आहे. जमिनीपासूण ह्या तटाची उंची जवळजवळ पन्नास फूट असावी. चार दिशेला चारी कोपऱ्यात मिनारासारखे चार स्तंभ उभे असलेले आढळतात.

मोरगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, हे गाणप्य सांप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. ह्या पुण्यक्षेत्राबद्दल गणेशपुराणात बरीच महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. ह्या क्षेत्राचे प्राचीन नाव, ‘भूस्वानंदभुवन’. ह्या गावात मोरांबी वस्ती अगदी भरपूर आहे. म्हणूनच ह्या गावाला मोरगाव असे नाव पडले असावे. आणि मोरम्हणजे मयूर, म्हणून इथला देव मयुरेश्वर.

ह्या मंदिराचे तोंड उत्तरेकडे आहे. मंदिर उंचवट्यावर असल्यामुळे मंदिरात शिरण्यापूर्वी पायऱ्या चढाव्या लागतात. प्राकाराबाहेर पायऱ्या चढण्यापूर्वी नगारखाना आहे. आणि नगारखान्याच्या खालच्या बाजूला, आपल्या पुढल्या दोनपायांत लाडू धरलेला उंदीर उभा आहे. त्याच्यापुढे पंधरा फूट उंचीवर दगडी चौथऱ्यावर नंदी बसलेला आहे. त्या दगडी चौथऱ्यापुढे दहा-बारा फूट अंतरावर मुख्य मंदिर आहे. त्याचा प्राकार दुसऱ्या एका चौथऱ्यावर आहे. ह्या चौथऱ्यावर सभामंडप आहे आणि सभामंडपला लागून, पूर्वेकडे देवाचे शेजघर आहे. सभामंडपाचे पूर्वेला आवारामध्ये एक शमीचे आणि एक बिल्वदलाचे झाड आहे. पश्चिम दिशेला कल्पवृक्ष आहे. दर्शनाला आलेले भक्तजन याच वृक्षाला बसून अनुष्ठान करीत असतात.

मोरया गोसावी यांनी सुद्धा याच वृक्षाखाली तपश्चर्या केली.

तटाच्या आतल्या बाजूला चौकाच्या आठ कोपऱ्यांवर श्रीगणेशाच्या आठ प्रतिमा बसविलेल्या आहेत. तेवीस परिवार मूर्ती नवीन करून घेतलेल्या आहेत. आणि त्या मंदिरात सर्वत्र बसविलेल्या आहेत.

सभामंडपानंतर मुख्य गाभारा लागतो. गाभाऱ्यातील श्री मोरेश्वराची मूर्ती अत्यंत रमणीय आशी आहे. मूर्तीच्या डोळ्यांत आणि बेंबीमध्ये हिरे बसविलेले आहेत. मूर्तीच्या डोक्यावर नागाची फणा आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सिद्धी बुद्धीच्या मूर्ती उभ्या आहेत. त्या पितळेच्या आहेत. मोरेश्वराची मूर्ती भव्य आणि रेखीव अशी आहे.

असे म्हणतात की ही मूर्ती मूळची नव्हे. खरी मूर्ती रत्नांचा चुरा, लोह आणि माती यांनी बनलेलि असून ती दृश्य मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे.

मूळ मूर्तीची स्थापना स्वतःअ ब्रह्मदेवानेच केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत येथे आले असताना त्यांनी मूळ मूर्तीला कुणाचा धक्का लागू नये म्हणून तिला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त करून ठेवली. आणि हल्लीची मूती नित्यपूजेसाठी स्थापन करण्यात आली.

मोरया गोसावी यांचा जन्म याच क्षेत्रात झाला. एक दिवस, ब्रह्मकमंडलू-तीर्थात स्नान करीत असताना त्यांना गणेशाची मूर्ती सापडली ह्या क्षेत्रामध्येच त्यांनी उग्र तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त करून घेतली. श्रीरावेशाच्या आज्ञेवरूनच आपल्याला कुंडात सापडलेली मूर्ती चिंचवड येथे नेली. आणि तेथे त्या मूर्तीची स्थापना केली. आणि चिंचवडला येऊन राहिले होते. तरीसुद्धा प्रत्येक शुद्ध चतुर्थीला ते मोरगावची वारी करायला कधीही चुकत नसत. शेवटी पवनाकाठी त्यांनी जिवंत समाधी घेतली.

ह्या मोरेश्वराविषयी, पुराणात काही माहिती दिलेली आहे.

कोणे एकेकाळी चक्रपाणी ह्या नावाचा एक राजा मिथिल देशात भंडकी नगरीत होऊन गेला. त्याला सिंधू नावाचा पुत्र झाला. त्या सिंधूने उग्र तपश्चर्या केली आणि सूर्यनारायणाकडून अमरपदाची प्राप्ती करून घ्तली. त्यामुळे तो उन्मत्त झाला. आणि त्याने सर्व देवांना जिंकले आणि त्यांना छळ आरंभला. सर्व देव एकत्र झाले आणि श्री विष्णूला शरण गेले. श्री विष्णूने त्या सिंधूशी युद्ध सुरू केले. परंतु त्या युद्धात विष्णूचा पराभव झाला. आणि त्यामुळे देवांचा छळ तसाच चालू राहिला. सर्व देव आता श्रीगजाननाला शरण गेले. श्रीगजाननाची त्यांनी प्रार्थना केली. श्रीगजाननाने पार्वतीच्या पोटी अवतार घेतला. आणि मोरावर बसून त्याने सिंधूशी युद्ध केले. युद्धात सिंधूचा वध केला. तेव्हापासून मोरगावच्या गजाननाचे नाव मयुरेश्वर आथवा मोरेश्वर असे पडले.

ज्याची इच्छा धरावी, ती गोष्ट हा मोरया देतो अशी याची ख्याती आहे.

मोरया मोरया मी बाळ तान्हे ।

तुझीच सेवा करु काय जाण ।

अन्याय माझे कोट्यानुकोटी ।

मोरेश्वरा बा तू घाल पोटी ॥

कऱ्हेचे तिरी एकसे मोरगावू ।

तिथे नांदतो मोरया जाण पाहू ।

चला जाऊ यात्रे महापुण्य आहे ।

मनी इच्छिले मोरया देत आहे ॥

वरदविनायक | महड

ह्या देवस्थानाविषयी कथा
प्राचीन काळी विदर्भामध्ये कौंडिण्य नावाचे एक शहर होते. तेथे भीष्म नावाचा एक पराक्रमी आणि दानशूर असा राजा राज्य करीत होता. राजा असला तरी तो सुखी नव्हता कारण संततीचे सुख त्याला लाभले नव्हते. त्यामुळे आपल्या गादीला वारस नसणार आणि आपला वंशविस्तार होणार नाही याची त्याला चिंता लागून राहिली होती.

एके दिवशी त्याच विचारामुळे त्याचे डोके भणाणून गेले आणि राज्यकारभार आपल्या प्रधानावर सोपवून तो आपल्या राणीसह अरण्यात निघून गेला. अरण्यात गेल्यावर एकदा त्याची आणि विश्वमित्र ऋषींची गाठभेट झाली. आणि त्यांनी राजाला राज्य सोडून देण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने आपणास पुत्रसौख्य नसल्यामुळे आपण हा अरण्यावास पत्करला असे सांगितले. विश्वमित्रांनी राजाला एकाक्षर मंत्राचा जप करण्यचा उपदेश केला.

राजा अरण्यातून माघारी फिरला. राजधानीत परत आल्यावर त्याने दक्षाने बांधलेल्या मंदिरात एकाक्षरी मंत्राचा जप करायला सुरवात केली. उग्र तपश्चर्येमुळे सारे विश्व त्याराजाला श्रीगणेशमय दिसू लागले. श्रीगणेश प्रसन्न झाले, राजाने पुत्रप्राप्तीचा वर मागितला. श्रीगणेशानी ‘तथास्तु’ म्हटले.

यथाकाल भीष्म राजाला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव रुक्मांगदासे ठेवण्याट आले. तो तेजापुंज होता आणि त्याची कांती सोन्यासारखी होती. राजकुमाराला योग्य असे सर्व प्रकारचे शिक्षण त्याला दिले. आणि भिष्माने आपला राज्यकारभार त्याच्यावर सोपवून त्याला एकाक्षरी मंत्राचा उअप करण्याचा उपदेश केला.

राजकुमार रुक्मांगद एकदा शिकारीच्या निमित्ताने अरण्यात गेला. आपल्या नेमबाजीने त्याने बऱ्याच जनांवरांची शिकार केली. जनावरांचा पाठलाग करीत राहिल्यामुळेतो बराचसा थकला. त्याला विश्रांतीची जरुरी होती. म्हणूनच विश्रांतीसाठी जवळच असलेल्या एका ऋषिंच्या आश्रमात तो गेला. मुनी स्नानाला जाण्याच्या गडबडीत होते. त्यांना रुक्मांगदाने नमस्कार केला. त्याला आश्रमात बसावयास सांगून ऋषी आपल्या स्नानाला निघून गेले.

मुनीची पत्नी मुकुंदा ही अतिशय रूपवती अशी होती. तिचे रूपसौंदर्य अनुपम होते. रुक्मांगदाला दमल्यामुळे फार तहान लागली होती. त्याचा घसा कोरडा पडला होता. मुकुंदराजवळ त्याने पाणी मागितले. याचकाला तिने पाणी दिले. परंतु ती रुक्मांगदावर मोहित झाली.

तिला काही सुचेनासे झाले आणि रुक्मांगदाला बोलण्यात गुंतवून, तिने आपली वासना तृप्त करण्याची त्याला विनंती केली. परंतु रुक्मांगद तसे दुराचरण करायला तयार झाला नाही. त्याने तिला साफ साफ नकार दिला. तो वश झाला नाही म्हणून ती बरीच कामविव्हल झाली आणि तिने रुक्मांगदाला शाप दिला की, “तुला कुष्ट रोग होईल.

रुक्मांगद त्या आश्रमातून बाहेर पडताच, त्याच्या सोन्यासारख्या अंगावर कुष्ट रोगाचे पांढरे पट्टे दिसू लागले. त्याला फार दुःख झाले. लोकांना आपण आपले तोंड तरी कसे दाखवावे. याची त्याला लाज वाटू लागली. तो आपल्या राजधानीकडे गेलाच नाही. अरण्यातील एका वटवृक्षाखाली आसन ठोकून तो एकाक्षरी मंत्राचा जप करू लागला. त्या निराश बनलेल्या राजकुमारापुढे नारदमुनी प्रगट झाले. आणि त्याला म्हणाले, “कदंब नगरामध्ये गणपतीचे एक देवालय आहे. चिंतामणी ह्या नावाने तो देव आणि कदंबतीर्थ ह्या नावाने ते तीर्थ प्रसिद्ध आहे. देवालयासमोर एक सरोवर आहे. तेथे जाऊन त्या सरोवरात जर का तू स्नान केलेस तर तुझा कुष्ट रोग साफ बरा होईल. तेव्हा ताबडतोब तेथे जा आणि त्या सरोवरात स्नान कर.

रुक्मांगदाने उपदेश प्रमाण मानला आणि कुष्ठरोगापासून तो मुक्त झाला.

इकडे कामविव्हल झालेली मुकुंदा जवळच एका शिळेवर लवंडली. आणि रुक्मांगदाचे ध्यन करू लागली. ती बेसावध बसली होती. तिचे पती वाचक्नबी मुनी आश्रमात नव्हते. देवांचा राजा इंद्र याच्या ध्यानात ही गोष्ट आली. त्याने रुक्मांगदाचे रूप घेतले आणि मुकुंदाची कामेच्छा पूर्ण केली. ती गरोदर राहिली. आणि त्या संबंधापासून तिला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद.

ऋग्वेदातील मंत्रद्रष्टा असा मुनी तो हाच गृत्समद. अनीति मार्गातून त्याचा जन्म झाला म्हणून याज्ञिक मंडळी नेहमीच त्याचा धिक्कार करीत राहिली. त्याच्या जन्माची ती अजब कहाणी आत्रेय मुनींना अंतर्ज्ञानाने अगदी संपूर्ण माहीत झाली होती.

वांरवार, गृत्समदाच्या वाट्याला अवमान-अपमान येत राहिले.जेव्हा तेव्हा त्याची अवहेलना होऊ लागली. अशाच एका प्रसंगी, तो रागाने अगदी लालबुंद झाला. संतापाने पाय आपटीत तो आपल्या मातेकडे गेला आणि त्याने आपला पिता कोण म्हणून विचारले. ती म्हणाली- “रुक्मांगद”, आपल्या आईचा त्याला अतिशय राग आला आणि त्यान शाप दिला.

“तू अमाप फळे येणारी कंटकी होशील, पण तुझ्या फळांना एकही प्राणी कधी तोंड लावणार नाही.” त्याची आई मुकुंदा ही सुद्धा चिडली आणि तिने त्याला शाप दिला- “तुझ्या पोटी एक राक्षस जन्म घेईल आणि तिन्हीलोकांना तो त्रस्त करील.” इतक्यात आकाशवाणी झाली - “गृत्समद हा इंद्राचा पुत्र आहे.” मुकुंदा बोरीचे झाड झाली. मृत्समद घोर तपश्चर्या करण्यासाठी महडच्या अरण्यात आला.

“गणनां त्यां गणपती” ह्या मंत्राचा त्याने जप केला. श्रीगजानन त्याच्यावर प्रसन्न झाले आणि तो मंत्रद्रष्टा बनला.

महडच्या श्रीवरदविनायकाची मूर्ती, त्या गृत्समदाने स्थापन केली. आणि त्यानेच हे देवालय बांधले अशी समजूत आहे.

देवालय पूर्वाभिमूख आहे. लांबून ते एखाद्या कौलारू घराप्रमाणे दिसते. परंतु आत शिरल्यावर आपल्याला कळून येते की ते कोरलेल्या दगडाचे आहे. कोरीव काम मोठे प्रेक्षणीय आहे. मूर्तीसंबंधी दुसरी एक समजूत अशी आहे की, १६९० साली ही मूर्ती एका गणेशभक्ताला तीथल्या तळ्यात सापडली. त्या भक्तान मूर्तीची स्थापना एका अखंड दगडाच्या कोनाड्यात केली. हल्लीचे देवालय हे १७२५ साली बांधण्यात आले. १८९२ सालापासून ह्या देवालयातील नंदादीप अखंडपणे तेवत आहे. मूर्ती सिंहासनावर विराजमान झालेली आहे. सिंहासनाभोवती दगडी महिरप आहे. दोनहत्तीआणि मध्य देवी आहे. सिंहासनाहून मूर्ती वेगळी आहे. मूर्ती पाषाणाची असून डाव्या सोडेंची आहे. मंदिराच्या घुमटाला सोनेरी रंगाचा कळस आहे. देवाच्या गाभाऱ्यापुढे आठ फुटाचा सौरस सभामंडप आहे. बाहेरचा सभामंडप चाळीस फूट लांब आणि चाळीस फूट रुंद अस ऐसपैस आहे. चौफेर गॅलरीवजा माडीही आहे.

देवस्थानाच्या खर्चासाठी नगदी इनाम आहे. १६९० साली शाहू महराजांनी पहिली सनद दिली. १७३० साली दुसरी सनद देण्यात आली. आणि तिसरी सनद ब्रिटीश अमदानीत देण्यात आली ती १८९४ साली.

महडगावी वरदमूर्ती । करी कामनांची पूर्ति ।

गृत्समदे केली कीर्ती । गणनांत्वा गणपतीम्‌ ॥

हरिश्चंद्रगड

पुण्याहून नाशिक मार्गावर आळेफाटा येथे येऊन कल्यान मुरबाडकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गांव आहे. येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे. ( पायी अंतर ४ ते ५ तास ) हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पश्मिमेला कोकणकडा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. अर्धवर्तुळाकार आणि डोकावणाऱ्या ह्या कातळकड्याची सरळ उंची १५०० फूट आहे. खिरेश्वर येथील एक प्रेक्षणीय मंदिर व लेणे धरणाच्या पाण्याखाली गेले आहे.

किल्ल्याची उंची : ४००० फुट

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग : माळशेज

जिल्हा : नगर

श्रेणी : मध्यम

हरिश्चंद्रगड(Harishchandragad) म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड, एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढलतो. १७४७ - ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.

गडावरील पहाण्यासाखी ठिकाणे :
टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :
तळापासून या मंदिराची उंची साधारणतः

सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहाआहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केल आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.

'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर

तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम

पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु ।

सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता ।

सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्हन

संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु ।

महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति ।

आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥'

हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून `तत्वसार' नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात.

मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एकभाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.

केदारश्वराची गुहा :
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या

हातास एकगुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.

तारामती शिखर :
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उम्ची ४८५० फूटा. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.

कोकणकडा :
कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा , वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साईक्सला येथे आहे.

गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड `ट्रेकर्सची पंढरी' ठरतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोनते तीन दिवसांची सवड हवी. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.

खिरेश्वर गावातून वाट :
सर्वात प्रचलित असणारी वाटही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेले आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. १. एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात मंदिरापर्यंत पोहचते. २. दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.

नगर जिल्ह्यातून :
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. १. राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. २. हल्लीच राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. राजूर, अंबीट, पाचनई, मूळा नदीच्या खोऱ्यातून, धनचक्कर या बालेश्वर रांगेतील टेकाडास वळसा घालून ही वाट टोलारखिंडीत पोहचते. ही वाट सरळ एक तासात टोलारखिंडीत घेऊन जाते. समोरच एक व्याघ्रशिल्प आढळते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात पोहचता येते.

सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग :
गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटामार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबाना. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळ्शेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णेगावात उतरावे. येथून `बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट' असेही म्हणतात.

राहण्याची सोय :
गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेशगुहा व आजुबाजूच्या गुहेत सहता येते.

जेवणाची सोय :
जेवणाची सोय गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे.

पाण्याची सोय :
पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
खिरेश्वर मार्गे ४ तास तर पाचनई मार्गे ३ तास लागतात.

जेजुरी खंडोबा

जेजुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये पुण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी चंपाषष्ठी, दसरा व चैत्री पाडवा या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो. त्या दिवशी प्रामुख्याने छबीना निघून पालखीमधून देव हे गडाखाली असणाऱ्या तलावामध्ये नेऊन तेथे धार्मिक स्नान घालतात. येथे मार्गशीर्षमध्ये नवरात्रोत्सवही साजरा करण्यात येतो. त्याशिवाय सोमवती अमावस्येस ठिकठिकाणीहून लाखो भक्तगण येथे येऊन भंडारा उधळतात. येथे विशेषकरून प्रसाद (भंडारा) हे कागद अगर प्लॅस्टिकच्या पिशवीत न घेता कापडी पिशवीतच घेतला जातो. मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून विशाल, भव्यदिव्य आहे.

मंदिरासमोर १०x१२ फूट लांबीची पितळी कासवाची प्रतिकृती आहे. त्यावरती खंडोबाच्या नावाने खोबरे व भंडारा उधळतात जातो व हा उधळलेला भंडारा लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता तो सर्वजण प्रसाद वेचून घेतात. येथील प्रदक्षिणेच्या मार्गावरूनच सर्वसाधारपणे १॥ किलोमीटर अंतरावर कडेपठार हे खंडोबाचे वास्तव्याचे मूळ ठिकाण आहे. भाविक लोक आवर्जून तेथे जातात.

देवास देणगीरूपाने पैसे मिळतात व पंच कमिटी या पैशातून वर्षभराचे धार्मिक खर्च करते. देवास वेगळे उत्पन्न नाही. मुख्य गुरवाकडून त्रिकाल देवतांची पूजा होते. मुख्य नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. खंडोबाचे मुख्य दैवत म्हणून वाघ्यामुरळी हे येथे प्रतिवर्षी हजेरी लावून जातात. इंदौरचे होळकर घराण्याचे खंडोबा हे कुलदैवत असून अहिल्याबाई होळकर यांनी सदर देवळाचा जीर्णोद्धार केला. गडाखाली भक्कम बांधकामाचे सरोवर (तलाव) आहे. धनगर समाजाचे लोक हे मुख्य दैवत म्हणून मानतात.

लोकसंख्या अंदाजे - ४०,००० (चाळीस हजार)
पुण्यापासून चाळीस कि.मी. अंतरावर जेजुरी हे गाव
ता. पुरंदर, जि. पुणे, मु.पो. जेजुरी - ४१२ ३०३

गुरुवार, १४ जुलै, २०११

जमलंच तर.....करून बघा

जमलंच तर.....करून बघा


वाढदिवसाच्या व इतर कोणत्याही शुभेच्छा द्या --- मराठीतूनच...!

भ्रमणध्वनी क्रमांक सांगा --- मराठीतूनच...!

आकडे लिहा ---- मराठीतूनच...!

गाडीचालकाला पत्ता सांगा ---- मराठीतूनच...!

फळवाल्याशी घासाघीस करा ---- मराठीतूनच...!

दारावरची पाटी ---- मराठीतूनच...!

नावाची अद्याक्षरे ---- मराठीतूनच...!

संभाषण आणि नोंदी ----- मराठीतूनच...!

स्वाक्षरी करा ----- केवळ मराठीतूनच...!

आणि

भ्रमणध्वनी वर CALLER TUNE, RINGTONE सुद्धा...... मराठीतूनच...!

मराठीतूनच बोला,
...मराठीतूनच ऎका
.....आणि मराठीतूनच ऐकवा..

महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा..

मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा......

मला आहे मराठीची जाण
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान
मी मराठी… या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे

पहिला मराठी बाणा - "मोडेल पण वाकणार नाही"
आता आमचा मराठी बाणा-"मी वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही "

"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा"

मराठीला कधीच कमी समजू नका..!
जय महाराष्ट्र....
करा कष्ट.....
व्हा श्रेष्ठ......
आणि मराठ्यांचं प्रभुत्व प्रत्येक क्षेत्रात प्रस्तापित करा..

मराठी असल्याचा गर्व आहे.............असलाच पाहिजे..

श्री द ग्रेट मराठा

जय भवानी ! जय शिवाजी !!

एक दिवस असा येईल कि हे सारा महाराष्ट्रच बदलून जाईल..... फक्त सुरुवात स्वतःह पासून करा..
--

अन घोडा उधळला!

काही वर्षांपूवीर्ची गोष्ट आहे. आम्ही मित्रांनी गोव्याला जाण्याचा बेत आखला. शनिवार, रविवार जोडून पूर्ण आठवड्याची झकास ट्रीप करण्याच्या हेतूने प्ल

ॅनिंग सुरू केले. संपूर्ण गोवा फिरायचे म्हणून बसने न जाता आपले स्वत:चे वाहन असेल तर मस्त एन्जॉय होईल असे वाटल्याने गाडी काढली. फेब्रुवारी महिन्याचे अखेरचे दिवस होते, उन्हाळा जाणवू लागला होता. फोंडाघाट ओलांडून गोव्यात प्रवेश करताना कडक उन झाले. पणजीत हॉटेल बुक करून सर्वजण फ्रेश झालो. एव्हाना सायंकाळ झाली होती. आजची रात्र आराम करून उद्या साईट सिईंग करावे असे ठरवून मस्त ताणून दिली. सकाळी ताजे होऊन प्रथम गाठले ते बीच. मीरामार बीच. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उसळणारा विशाल सागर चांदण्यांसारखा रूपेरी वाळूचा किनारा. गोव्याच्या समुदाचे पाणी स्फटिकासारखे नितळ आहे. किनाऱ्यावर कित्येक परदेशी पर्यटक. समुदाच्या लाटांवर स्वार होण्याची इच्छा कुणाला होणार नाही? किनाऱ्यावर चौपाटीत मस्ती केली. किनाऱ्यावर बरेचसे ऐटदार घोडे उभे होते. साहजिकच माझ्यासकट आणखी दोन-तीनजणांना घोड्यावर बसून चौपाटी फिरण्याची इच्छा झाली. आयुष्यात पहिल्यांदाच घोड्यावर बसणार होतो त्यामुळे तशी उत्सुकता होतीच. (आमची लग्नाची वरात कारमध्ये झाली आहे बरं!) बाकी मित्र आपापल्या आवडीच्या घोड्यांवर बसले व रपेट मारायला निघून गेले. मी कमी उंचीचा घोडा निवडला, घोडेवाला दुसऱ्या एकाशी बोलण्यात गुंगला होता तोपर्यंत आपण बसून घ्यावे असा साधा विचार करून मी घोड्यावर मांड ठोकली अन जो घोडा उधळला. या अनपेक्षीत घटनेने माझ्या अंगाचा थरकाप उडाला. किनाऱ्यावरील पर्यटकांच्या गदीर्तून मार्ग काढत घोडा पळत सुटला आणि भीतीने मी अधिकच लगाम ओढत गेलो. घोडा आणखीनच वेग वाढवत गेला. तो एकदम समुदाच्या दिशेने वळाला अन पुढचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तो अगदी खोलवर घेऊन जात असताना आता आपण काही वाचत नाही असे समजून देवाचा धावा सुरू केला. तोच मोठी लाट आली अन तिच्याबरोबर आम्हीही किनाऱ्यावर आलो. चार पाच लोकांनी मला उचलून आणले मोठी गदीर् जमली. माझी स्थिती लक्षात न घेता जो तो मला घोडा कसा चालवायचा याचं नॉलेज देऊ लागला. एव्हाना माझे मित्र माझ्यापर्यंत पोहोचले होते. मला धीर देत होते. दहा-पंधरा मिनिटांचा तो थरार अजूनही माझा थरकाप उडवून जातो.

आमोल घायाळ ( मृगजळ ग्रूप मुंबई )

धबधबे आणि अभयारण्याची सैर

पाऊस सुरू झाला निसर्गप्रेमींची पावलं आपोआप सह्यादीच्या पर्वतरांगांकडे वळतात. उंचावरुन कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचं वातावरण हे सारं अनुभवण्

यासारखं असतं. पावसाळ्यात दरवषीर् अनेक स्पॉट्स पर्यटकांनी गजबजतात. मात्र नेहमीच्या या ठिकाणांपेक्षा काही वेगळे स्पॉट्सही आहेत जिथे तुम्ही पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटू शकता.
.............

पावसाळ्यात पर्यटकांचे पाय रायगड जिल्ह्याकडे वळतात ते रायगडमधील डोंगरावरून कोसळणाऱ्या मनमोहक धबधबे पाहण्यासाठी व मस्त धबधब्याखाली ओलेचिंब होण्यासाठी. ही मजा काय औरच असते. वीकेण्डला रायगडमधल्या ताम्हाणी घाट, वरंध घाट, तसेच खोपोली, कर्जतपासून फणसाड (मुरुड) व अलिबागमध्येही पर्यटक फिरत असतात. मुंबईकरांना ताम्हाणी व वरंध घाट दूरचा असल्याने ते कर्जत, खोपोली तसेच अलिबाग व मुरुडकडील प्रदेशाला विशेष पसंती देतात. अलिबाग व मुरुडची ट्रीप म्हणजे 'डबल धमाका.' धबधब्यावरून ओलेचिंब होऊन यायचं आणि नंतर समुदावरच्या रेतीमध्ये निवांत बसायचं.

खोपोलीजवळील झेनिथचा धबधबा अलिकडे पर्यटकांना धोकादायक वाटत असल्याने अनेकजण त्याकडे पाठ फिरवत आहेत. मात्र याचवेळी कर्जत व खोपोली दरम्यान असलेल्या पळसदरी गावातील हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण होत चालला आहे. झेनिथपेक्षा हा धबधबा जवळ आहे. मुंबईहून खोपोली लोकल पकडल्यानंतर कर्जत स्टेशनच्या पुढील पहिले स्टेशन पळसदरी लागते. स्टेशनपासून दोन कि.मी. अंतरावर पळसदरी गावाच्या मागे डोंगराच्या कुशीत हा धबधबा आहे. पळसदरी स्टेशनवर जेवणाची सोय नसली तरी गावामध्ये राहण्याची व जेवणाची घरगुती व्यवस्था होते. चुलीवरच्या जेवणाची लज्जत पर्यटकांच्या आनंदात अधिकच भर घालते. धरणाकडे जाताना 'रेल्वेधरण' म्हणून ओळखलं जाणारं १९०५ सालचं ब्रिटिशकालीन धरण पर्यटकांचं लक्ष वेधून घेते. या धरणावरूनच गावाकडे रस्ता जातो. गावात विनंती केल्यास जेवणाची व्यवस्था केली जाते. अलिबाग व मुरुड येथील फणसाड अभयारण्यातील धबधबेदेखील पर्यटकांचे आकर्षण होत चालले आहे. अलिबागपासून ३० कि.मी. व मुरुडपासून २० कि.मी.वर असलेल्या फणसाड अभयारण्यातल्या धबधब्यांनाही पर्यटक भेट देतात. धबधब्यात भिजण्याच्या मजेबरोबरच अभयारण्याची सैर करता येते. तसेच मुरुड व काशीदच्या समुदकिनाऱ्यावरही भटकंती करता येते. फणसाडमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था विनंतीवरून होऊ शकते.


amol ghayal (mrugjal group)



भुशी डॅमवर तिकिटाशिवाय 'नो एन्ट्री'?



पावसाळा म्हटलं की तरुणाईच्या आनंदाला उधाण येतं आणि मग आपोआपच पावलं डोंगर-द-या , धबधबे , धरणांच्या दिशेनं वळतात. विकेण्डला चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई-पुणेकरांचं एक ‘ फेव्हरिट डेस्टिनेशन ’ म्हणजे , लोणावळ्याचा ‘ भुशी डॅम ’... परंतु , आता भुशी डॅमवर जाऊन पाण्यात डुंबण्यासाठी आता तिकीट काढावं लागणार आहे. कारण या धरणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचं रेल्वेच्या पर्यटन विभागानं ठरवलंय.

पावसाळ्यात आणि इतर सुट्टीच्या दिवशी भुशी डॅमला भेट देणा-या पर्यटकांची संख्या १० हजाराहून अधिक आहे. सकाळी लवकरात लवकर तिथे पोहोचायचं , धबधब्याखाली चिंब भिजायचं , मग डॅमच्या पाय-यांवरून वाहणा-या पाण्यात लोळायचं आणि रिफ्रेश होऊन संध्याकाळी घरी परतायचं , असा इथे येणा-या मंडळींचा दिनक्रम असतो. मुंबई-पुणेकरांचं भुशी डॅमवरचं हे प्रेम आयआरसीटीसीनं अचूक हेरलंय आणि एक उत्तम ‘ इन्कम सोर्स ’ म्हणून त्याकडे पाहायचं ठरवलंय. भुशी डॅमचा आनंद लुटण्यासाठी येणा-या पर्यटकांना तिकीट लावण्याचा त्यांचा विचार असून तसा प्रस्तावही मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आलाय.

भूशी डॅम हा इंग्रजांच्या काळात जीआयआरपी या रेल्वे कंपनीने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बांधला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात याची मालकी मध्ये रेल्वेकडे आली. या ठिकाणी येणारा पर्यटकवर्ग पाहता या जागेचा विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात काय पावलं उचलता येतील , याची संपूर्ण माहिती असलेला आराखडा मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आल्याचे रेल्वे पर्यटन विभागाचे संचालक विरेंद्र सिंग यांनी सांगितलं.

या संपूर्ण परिसरापैकी सुमारे २० हजार चौरस फुट जागेचा विकास करण्यात यावा , असं या प्रस्तावात सुचवण्यात आलं आहे. तसेच पर्यटकांना विश्रांतीसाठी तंबू उभारणं , पाण्यामुळे पाय-यांवर जमा होणारे शेवाळं साफ करणं , परिसर स्वच्छ ठेवणं , खाद्यपर्थांची सोय उपलब्ध करून देणं असे अनेक पर्यायही यात सुचवण्यात आले आहेत.

अद्याप हा प्रस्ताव कागदावरच असून या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरवायचा असल्यास काही कोटी रुपयांचा खर्च येईल , असे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले. परंतु ते या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करत असल्याचंही त्यांनी सूचित केलंय. हा प्रस्ताव संमत झाला तर भुशी डॅमचा परिसर चकाचक होईल , पण त्यासाठी पर्यटकांना स्वतःचा खिसा थोडा हलकाही करावा लागेल


amol ghayal (mrugjal group)

किल्ल्यांतली भटकंती


मान्सून म्हणजे हिरवाकं च निसर्ग...मान्सून म्हणजे मनसोक्त भिजणं...घरात बसून पाऊस कसा एन्जॉय करणार. मग ओघाने येतं ते ट्रेकिंग..पाऊसवेडे असलेल्या अनेक

कॉलेजिअन्सचे एकामागोमाग एक पिकनिक आणि ट्रेकिंगचे प्लॅन ठरलेलेच असतात. 'मान्सून म्हटलं की मला हिरवागार निसर्ग आठवतो. कधी एकदा धबधबे सुरू होतायंत आणि मी ग्रुपला घेऊन ट्रेकिंगला जातोय असं झालेलं असतं. कडक उन्हातून चालताना अचानक पावसाचा पहिला थेंब अंगावर पडतो, तेव्हाच मन चिंब भिजून कुठलातरी ट्रेक करून येतं, असं विद्यालंकार कॉलेजचा कौस्तुभ राणे सांगतो. त्यांच्या ग्रुपला शिवरायांनी बांधलेले गड-किल्ले फिरण्याचं वेड आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात त्यांना किल्ल्यांवरचे ट्रेक करायला आवडतं.

तो म्हणतो, 'राजमाची, रायगड, राजगड, कळसूबाई, आज्यापर्वत, कोथली, सज्जनगड असे एक ना अनेक किल्ले ही आमची पावसातली पहिली मोहीम असते. कधी आमचा ग्रुप तर कधी प्रॉपर ट्रेकही अरेंजही करतो. काही वर्षांपासून आम्ही प्रत्येक गड-किल्ल्याच्या ट्रेकमध्ये अनेक प्रकारची झाडं लावण्याचं उपक्रम राबवतो आहोत.पावसाळ्यातल्या या स्पेशल पिकनिकचा आणखी एक आवडणारा भाग म्हणजे उंच डोंगरावरची घरं, तिथल्या माणसांनी करून दिलेली गरमागरम भाकरी आणि सोबत तिखट चटणी, पिठलं किंवा मटण. मग काय...सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असू शकतं
..............

वडा गर्रम...

कर्जत स्टेशनला उतरलं की वड्यांचा

घमघमाट अनुभवला नाही आस्वाद घेतला नाही असा एकही प्रवासी नसेल. पावसाची मजा लुटायला जाणारा कोणताही ट्रेकर असू देत, दिवाडकरांकडचा वडा खाल्लाच पाहिजे. मान्सून पिकनिक आखणारा प्रत्येक ग्रुप आपल्या कार्यक्रमाच्या यादीत नाश्ता किंवा चक्क जेवण म्हणून दिवाडकरांचा वडा अॅड करतो. कर्जत स्टेशनला उतरल्यावर बाजारपेठेत चालत गेलं की काही मिनिटांच्या अंतरावर दिवाडकरांच्या वड्यांचं दुकानही आहे.

पाऊस सुरू झाला की प्रत्येक वीकेण्डला सुमारे शंभर-सव्वाशे लोक तरी कर्जतमध्ये दाखल होतात. धबधब्यांवर जाण्यासाठी बाजारपेठेतूनच रस्ता असल्याने दिवाडकर भेट ही ठरलेलीच असते. पावसाळ्यात इथे कायम गदीर् असते. सकाळी आणि संध्याकाळी ट्रेकर्स, फॅमिली हटकून येतातच. यामुळेच इतक्या वर्षांनंतर पाऊस आणि गरमागरम वाफा येत असलेला तिखट लसणाच्या चटणीबरोबर र्सव्ह केलेला वडा हे खास समीकरण अद्याप जुळलेलं आहे

amol ghayal (mrugjal group)


पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमण

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या ३५१व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना व त्यांच्या शूर सरदारांना मानवंदना देण्यासाठी 'भरारी' या गिर्यारोहण संस्थेने १

३ ते १६ जुलै या काळात पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेचं आयोजन केलं आहे. या मोहिमेला इतिहासतज्ज्ञ आप्पा परब यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. 'भरारी' संस्थेतफेर् गेली १२ वषेर् हा उपक्रम राबवला जात आहे. मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी मंदार खेडेकर ९७०२००१६६१, हर्षद जोशी ९८२१६३६२४३ किंवा राजेंद देशपांडे ९८६९४६२७४७ यांच्याशी संपर्क साधावा.
............

शिवशौर्य ट्रेकर्सचीही मानवंदना

शिवशौर्य ट्रेकर्सनेही पन्हाळगड-विशाळगड या मार्गावर १४ ते १७ जुलै या कालावधीत पदभ्रमणाचं आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०९३२०७५५५३९ / ०९८६९१०९९७०

ट्रेकचं आयोजन

' ट्री हिल ट्रेक'ने २६ जूनला एका ट्रेकचं आयोजन केलं आहे. या ट्रेकला येऊ इच्छिणाऱ्यांनी २५ जूनच्या रात्री ११.३० वाजता सीएसटी स्टेशनवर मुख्य इंडिकेटरजवळ जमायचं आहे. संपर्क : ९८९२४७३४९७ ९८६९३८५५३१



amol ghayal (mrugjal group)

ट्रेक



पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं. भुरभरता पाऊस कोसळत असताना दऱ्याखोऱ्यांतून हिंडणं हा अनुभव एकदम आगळावेगळा ठरतो. पहिला पाऊस पडून ग

ेला की अस्सल ट्रेकर्सना ट्रेकिंगचे वेध लागतात. ट्रेकिंग प्लॅन आखणाऱ्या संस्था विविध ठिकाणी ट्रेक्स आखत असतात. तुम्ही जर पहिल्यांदा ट्रेकिंगला जाणार असाल तर काही गोष्टी मात्र नीट लक्षात ठेवायला हव्यात.

> आपण कोणत्या ग्रुपबरोबर जातो? या क्षेत्रामध्ये त्यांना किती वर्षांचा अनुभव आहे तसंच त्यांच्याकडे किती अनुभवी गिर्यारोहक आहेत याची माहिती आधी करून घ्यावी.

> शक्यतो एकच दिवसाच्या ट्रेकला जावे. त्या अनुभवानंतर मग दोन-तीन दिवसांच्या ट्रेकला जावं.

> आपण ज्या ट्रेकला जाणार आहोत, त्या ठिकाणाची माहिती अगोदर करून घ्यावी. ठिकाणाचं नाव, तिथलं जवळपासचं गाव, पोलीस स्टेशन कुठे आहे ते जाणून घ्या.

> ज्या ठिकाणी जाणार तिथे किती तास चालावं लागणार आहे याची माहिती अगोदर करून घ्यावी.

> आपण पावसाळी ट्रेकला जाणार आहोत, पिकनिकला नाही याचं भान जरुर ठेवा.

> ट्रेकिंगला जाताना रकसॅक मध्ये प्लास्टिकची पिशवी टाकून, त्यानंतरच त्यामध्ये कपडे व इतर सामान भरा.

> एक जोडी जास्तीचे कपडे, एकवेळचं जेवण, वॉटर बॉटल, ताट वाटी, ग्लास, टॉवेल, नॅपकिन, टॉर्च, स्वत:ला लागणारी औषधं, स्लीपर व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून सॅकमध्ये ठेवावं.

> पावसाळ्यात निघणार असल्याने छत्री, रेनकोट सोबत असू द्यावंच.

> कोणतेही स्पोर्टस् शूज, ट्रेकिंगचे शूज घालूनच ट्रेक करा.

> जास्तीची प्लास्टिकची पिशवी सोबत ठेवावी. भिजलेले ओले कपडे ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

> आयोजकांपैकी चार-पाच जणांचा मोबाईल नंबर, ट्रेकची माहिती, ट्रेकवरून कधी घरी परतणार याची माहिती कुटुंबियांना अवश्य द्यावी.

> ग्रुप लीडर, आयोजकांच्या जे सांगेल त्या आदेशाचं पूर्ण पालन करावं.

> ट्रेकला सर्वात पुढे लीडर असतो, त्याच्या पुढे जायचं नाही तसंच सर्वात शेवटीही राहायचं नाही हे लक्षात असू द्या.

> स्वत:हून नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न कधीच करू नका.

> चालताना एक-दुसऱ्याला ओव्हरटेक करू नका.

> वाटेतले नदी-नाले ओलांडताना, लीडरच्या आदेशाचंच पालन करा. अतिसाहस बिलकूल करू नका. नदी लहान असली तरी प्रवाहाच्या वेगाने वाहून जाण्याची भीती असते.

> पोहता येत नसेल तर पाण्यात उतरू नये. आणि येत असेल तरी अतिआत्मविश्वासाने वावरु नका.

> डोंगर चढतांना छोटी झुडूप, किंवा दगडांना पकडतांना विशेष काळजी घ्यावी. ते कधीही निसटण्याची शक्यता असते. म्हणून त्याचा आधार घेऊन चढू नये.

> ट्रेकला जाताना फुल पॅन्ट (ट्रॅक पॅन्ट), फुल हाताचे कपडे घाला. बर्मुडा हाफ पॅन्ट घालू नये.

> दागिने / मौल्यवान वस्तू बिलकूल जवळ बाळगू नका.

> कॅमेऱ्याची विशेष काळजी घ्या. फोटोग्राफी करतांना वेळेचं भान ठेवा.

> ऐतिहासिक वास्तूंना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नका. अशा ठिकाणी कुठेही आपलं नाव लिहू नका.

> कोणतंही व्यसन-मद्यपान, सिगरेट ओढणं, तंबाखू-गुटखा खाणं टाळा.

> चॉकलेटचे रॅपर, बिस्किट-वेफर्सची रिकामी पिशवी, प्लास्टिकची रिकामी बाटली, थंड पेयांची रिकामी डबे (टिन) ट्रेकच्या वाटेवर टाकू नका. खाऊन झाल्यावर या गोष्टी स्वत:च्या सॅकमध्ये ठेवावा. ट्रेक संपल्यावर ते कचरापेटीत टाका. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचेल असं काहीही करू नका.

> चालताना किंवा संपूर्ण ट्रेकमध्ये मोबाईलवर गाणी लावू नका. कोणतंही ध्वनी प्रदूषण नको.

> हृदयरोगी, दम्याचे रोगी यांनी शक्यतो ट्रेकला जाऊ नये. आपल्या आजारांविषयी आयोजकांना माहिती द्यावी.

> ट्रेक संपल्यावर ओले शूज काढून, स्लीपर्स घालावेत. अन्यथा ओल्या शूजमुळे पायाला ब्लिस्टर होण्याची शक्यता असते.

> ट्रेकला चालताना एकमेकांशी बोलण्यापेक्षा डोळे-कान उघडे ठेवून पशू-पशी, फुलं-झाडं यांचं निरीक्षण करा.

> ट्रेकसाठी ज्या गावात जातोय तिथल्या गावकऱ्यांशी ओळख करून घ्या. त्यांच्याशी सौहार्दाने वागा.




amol ghayal (mrugjal group)

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..

कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...

नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा

कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............!

पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा.............!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा

एक स्वप्नाळू मुलगी

एक स्वप्नाळू मुलगी ...
नुकतीच प्रेमात पडलेली ....
त्याच्या विचारात पुरती हरून गेलेली...."तो स्वप्नातला राजकुमार आपल्याला भेटला असं वाटून ती खूप सुखावली होती.
तिच्या मैत्रिणीनी तिला खूप समज दिली . हि मुलगी वेड्यासारखी अशा माणसावर प्रेम करतेय , ज्याला तिच्या प्रेमाची काहीच खबर नाही . उद्या तो नाही म्हणाला तर ती जीवच देईल याची त्यांना खात्री होती. झालंही तसंच.
एक दिवस जनामांची पर्वा न करता ती त्याला जाऊन भेटली . तिने त्याला सांगून टाकलं कि, "माझ तुज्यावर खूप प्रेम आहे . जीवापाड प्रेम आहे. तुही माझ्यावर तेवढंच प्रेम करतोस न?"
तो मुलगा सरळ नाही म्हणाला आणि निघून गेला .
हि बिचारी मोडून पडली ...तिच्या आयुष्यात त्या क्षणी सारंच संपलं होत. पण दुसरया दिवशी ती पुन्हा कॉलेजात आली . मैत्रीणीना भेटली तेवा मात्र एकदम नॉर्मल होती. नेहमी सारखी हसत-खेळत होती.
एका मात्रीनीने विचारले कि , " तू इतकी शांत,नॉर्मल कशी? तुला वाईट नाही वाटलं?"
ती म्हणाली ,वाटलं ना , खूप वाईट वाटलं . पण काय म्हणून रडत बसू? तो नाही म्हणाला म्हणून जीव देऊ का? माझ प्रेम खोट नव्हतं. ते त्याला कळलं नाही . तो त्याचा निर्णय घ्याला मोकळा आहे, त्याच्यावर जबरदस्ती कशी करता येईल ?
फक्त वाईट एवढंच कि, ज्या मुलीचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होत तिला तो गमावून बसला.
तोटा माझा नाही, त्याच झालाय .....
ज्याच माझ्यावर प्रेमच नव्हत , त्याला गमावण तसं फार वाईट नाही ..
पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कुणाला कायमच गमावून बसन....? ते प्रेम पुन्हा कुठून येईल....?????





भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या
दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्या अर्थाने यशस्वी भविष्य
घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."
‍..........................

काय असत प्रेमात

कशी असती काळजातली धडधड....? काय मज्जा असते चोरून चोरून भेटण्यात...?
कस वाटत तेच तेच फोनवर तासनतास बोलायला....?
काहीच माहिती नव्हत.....

चला एकदा '' TRY '' घ्यावा म्हणून प्रेमात पडायचं ठरवलं....
खोट - खोटच पण तरीही त्यात शिरायचं ठरवलं....
मित्रांना फुगवून सांगायचं.....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....

आणि एकदाचा तिच्या प्रेमात पडलो.....
तिला याची काहीच कल्पना नव्हती...!

आणि मी तसाच विचार करायला लागलो......
हुरहूर.......धडधड.....
जे काय असत ते सगळ मिळाल.....!!
मित्रांना फुगवून सांगितलं .....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....

पण...अचानक दोन - चार दिवस ती मला भेटलीच नाही....
आणि मग माझी मनात कालवाकालव व्हायला सुरु झाली ..
अरे.. हे सगळ खोट -खोट होत मग अस का होतंय.....

मी खोट - खोट म्हणता म्हणता .....
खरच प्रेमात पडलो....अगदी मनापासून ......!!

घरामध्ये बसू वाटत नव्हत......
ऑफिस मध्ये काम करू वाटत नव्हत.....
सतत तिचाच विचार.....
प्रत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायचा....!

एकट एकट राहू लागलो.....
शांत शांत ....गुमसुम राहू लागलो .....
'' दोस्तो कि दोस्ती,यारो कि यारी कम लगने लगी ''
हे सुद्धा खर झाल...!!

तिला तर काहीच सांगितलं नव्हत....
इकडे माझ्याच मनाचा गोंधळ चालला होता.....
तिला सांगाव म्हणून मी एका संधीची वाट पाहू लागलो......
आणि एक दिवशी तिच स्वतःहून माझ्याकडे आली...!

अरे वा......!
मी संधीला शोधण्यापेक्षा संधीच माझ्याकडे आली होती...!!
मी जाम खुश झालो......
ती आलीच.....पण.....
येताना ती तिच्या '' प्रेमाला '' घेवून आली....
खास माझ्या भेटीसाठी......

जखमेवर मीठ चोळतात तसच काहीतरी माझ झाल.....
पण तिला तरी काय दोष देणार..... तिला तरी हे काहीच माहिती नव्हत....
आणि आमच्या प्रेमाची कळी खुलण्याआधीच सुकून गेली....
आणि अस म्हणतात कि ......
'' जब दिल तुटता हैं तो उसकी आवाज नही आती....''
मी तो आवाज ऐकला......
अगदी खरा खरा.........

प्रेमात पडणं सोपं असतं

प्रेमात पडणं सोपं असतं
पण प्रेम निभवणं कठीण असतं

हातात हात घेऊन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेऊन
पाऊलवाट शोधणं कठीण असतं

कधी कधी एकमेकांत गुंतत जाणं सोपं असतं
पण ती गुंतवणुक आयुष्यभर जपणं कठीण असतं

माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणनं सोपं असतं
पण तोच विश्वास कायम ठेवुन वाटचाल करणं कठीण असतं

प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं
पण ती वचनं आणि शपथा निभवुन नेणं मात्र कठीण असतं

प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खरं बोलुन प्रेम टिकवणं मात्र नक्किच कठीण असतं

म्हणुन सांगते प्रेमात पडणं
सोप नसतं, सोप नसतं, सोप नसतं ..!

प्रेमाच्या आठवणी

गळ्यात मंगळसूत्र जरी त्याचे असेल,
तरी डोळ्यात काजळ माझे आहे.
ओठावर नाव जरी त्याचे असेल,
तरी हृदयात नाव माझे आहे.
सहवास त्याचा असला,
तरी प्रेमाचा सुवास माझाच आहे.
राहत असली जरी त्याच्या सोबत,
तरी प्रेमाच्या आठवणी माझ्याच आहेत

दादर म्हणजे दादर असतं

दादर म्हणजे दादर असतं
मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!
दादर म्हणजे दादर असतं

श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,
सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव
पार्कात विराजती उद्यान गणेश
नांवाजलेली शाळा-कॊलेजं
म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!
विद्यार्जन नि विद्यादानाला
जे सदैव सप्रेम सादर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर असतं!

वसंत देसाई, वसंत प्रभू
सी रामचंद्र नि सुधीर फडके
दादरचेच तर होते
ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर
चक्क नौशादसाहेब झोपत होते!
मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची
‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे
लताजींची रिहर्सल चालायची!
असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…
म्हणूनच गडया,
दादर म्हणजे दादर असतं...

छबिलदासचा फर्मास बटाटावडा
नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’
नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर
नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,
खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं
दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं
ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..
दादर म्हणजे दादर असतं...

शिवाजी पार्कच्या मैदानाला
एक किलोमीटरचा कटटा असतो,
तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत
इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!
चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो
’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा
मात्र निराळाच ढंग असतो!
पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी
काला-खटटा च्या गाडीवर मात्र
गि-हाईक हमेशा हजर असतं...
नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर असतं

हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत
साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत
लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत
फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!
पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ
फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ
भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का
गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का
अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत
दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!
हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं
दादर म्हणजे दादर असतं...

पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर
नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर
इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण
नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण
सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं
ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई
त्याच लोकांचं इथे घर असतं,
दादर म्हणजे दादर असतं....

हा भास तुझा होताना

स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

येरे येरे पाउसा

येरे येरे पाउसा,
तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा,
पाउसा आला मोठा

येग येग सरी,
तुझे मटकी भारी,
सर आली धावुन,
मटके गेले व्हावुन!

पाउसा पडला झिम, झिम, झिम,
आंगण झाले ओलेचिम्ब,
पाउसा पडतो मुसळधार,
रान होईल हिर्वेगार!

खंडाळ्यात घडलेली कविता

MahaGSBच्या प्रगतीचे पुढचे पाऊल पडले...
आणी मौज-मजा करायला सगळे GSB खंडाळ्याला जमले.

नवीन ओळखी, भरपूर उत्साह आणी मिटिंगची हौस...
या साठी destination ठरले Muscat house.

नाच-गाणी - धूम-धडाका - मस्ती सगळ्यांनी केली...
त्यातच शनिवारची रात्र, पूर्ण उलटून गेली.

अंताक्षरी - dumb Charades खेळून सगळ्यांना लागली खूप भूक...
पण tension not! कारण barbeque वर शिजत होती मस्त तंदूर.

पोटोबा भरल्यावर खेळ पुन्हा रंगला...
शामुर्च्या गाण्यांनी stage परत एकदा सजला.

एक-एक करत सगळे stage वर जमले...
आणी प्रत्येकाला वेगळे-वेगळे steps सुचू लागले.

टीपी करता करता रविवारचा दिवस उजाडला...
सूर्य पण GSBचा उत्साह पाहायला आकाशात उतरला.

जरी पहिल्यांदाच जमले होते सगळे at खंडाळा...
तरी सकाळी फिरायला जायचा नव्हता कोणाला कंटाळा.

रविवारी सकाळी हिल स्टेशन वर सगळे फिरून आले...
त्यानंतर लगेचच शेगडी वर veg आणी chicken शिजू लागले.

बघता बघता वेळ झाली सगळ्यांना bye - bye म्हणायची...
आणी झकास ग्रुप फोटो काढून आप-आपल्या घरी परतायची.

MahaGSBचा ग्रुप हळू-हळू वाढतो आहे...
पुढची ट्रीप कधी ठरते...त्या मेलची आतुरतेने वाट बघतो आहे

एक तरी मुलगी असावी

एक तरी मुलगी असावी,
'आई' म्हणून हाक ऐकावी,
प्रेमात माझ्या नखशिखांत,
भिजुन चिम्ब हसावी

एक तरी मुलगी असावी,
उमलताना बघावी,
नाजुक नखरे करताना,
न्याहाळायला मिळावी

एक तरी मुलगी असावी,
साजरी गोजरी दिसावी,
नाना मागण्या पुरवताना,
तारांबळ माझी उडावी

एक तरी मुलगी असावी,
माँचिंग करताना बघावी,
नटता नटता आईला तीने,
खुलण्याची तंत्र शिक्वावी

एक तरी मुलगी असावी,
जवळ येऊन बसावी,
मनातली गुपीत तीने,
हळूच कानात सांगावी

एक तरी मुलगी असावी,
गालातल्या गालात हसावी,
कधीतरी भावनेच्या भारांत तीने,
गळां मीठी घालावी

Mrugjal

Mala Na Kahi Kalale Te,
Satya Hote ki Asatya Te,
Mrug Hote ki Mrugajal Te...
Hya Shant Samayi,
Bhas Hote Ki Abhas Te!

Hya Ramya Samayi,
Mi Hurlun Gele,
Hakhun Gele,
Mand Mand Samirat Ya,
Bhan Kase Mi Visarun Gele!

Kashi Kay Konas Thave,
Mrug Samajun Durvar Gele,
Shabadanchya ya khotya Khelat Mi,
Asatya Hote He Visarun Gele

Swapanat Hote Ki Shishrat Mi,
Jaag Ali Teva Satyat Mi,
Kalale Teva Sarva Kahi,
Meet Navate Preet Navate,
Mrug Navate,
Fakta Mrugjal Hote te!
Fakta Mrugjal Hote te!!!

आई

पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जीने मला भरवला,
हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,
आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.

आठवतय मला,
चूकल्यावर धपाटा घातलेला,
भूक लागली आहे सांगताच,
खाऊचा डब्बा पुढे केलेला.

अनेकदा तिने,
जेवणासाठि थांबायचे,
आणि मी मात्र न सांगताच,
बाहेरून खाऊन यायचे.

कधी कधी रागाच्या भरात,
उलटहि बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर,
ढसा ढसा रडलोय.

तिने सुद्धा माझे बोलणे,
कधीच मनावर नाहि घेतले,
मागाहून घालवलेले माझे अश्रू,
पदराने पुसून टाकले.

माझी स्तुती करताना,
ती कधीच थांबत नाहि,
अन माझा मोठेपणा सांगतान ,
तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि.

माझा विचार करणे,
तिने कधिच सोडले नाहि,
माझ्यावर प्रेम करण्याला,
कधीच अंत नाही.

मी सुद्धा ठरवले आहे,
तिला नेहमी खुश ठेवायचे,
कितीहि काहि झाले तरी,
तिला नाहि दुखवायचे.

आईची महानता सांगायला,
शब्द कधीच पूरणार नाहि,
तिचे उपकार फ़ेडायला,
सात जन्म सुद्धा शक्य नाहि.

देवाकडे एकच मागणे,
भरपूर आयुश्य लाभो तिला,
माझ्या प्रत्येक जन्मी,
तिचाच गर्भ दे मजला.

PREM

प्रेम... एक छान संवेदना....
त्यात तुझ्या नि माझी गुंतल्या भावना,
प्रेम... वाळक्या लाकडाला फुटलेली नवी पालवी..
माझी प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीत जावी...
प्रेम... निर्जल झऱ्याला आलेली पाणवल..
तुझ्या माझी प्रेमाचे फुललेले प्रेम फुल..
प्रेम... ओसाड जमिनीवर आलेली एक हिरवळ ...
तुझ्या माझ्या प्रेमाची अशीच फुलत राहो कातरवेळ