काही वर्षांपूवीर्ची गोष्ट आहे. आम्ही मित्रांनी गोव्याला जाण्याचा बेत आखला. शनिवार, रविवार जोडून पूर्ण आठवड्याची झकास ट्रीप करण्याच्या हेतूने प्ल
ॅनिंग सुरू केले. संपूर्ण गोवा फिरायचे म्हणून बसने न जाता आपले स्वत:चे वाहन असेल तर मस्त एन्जॉय होईल असे वाटल्याने गाडी काढली. फेब्रुवारी महिन्याचे अखेरचे दिवस होते, उन्हाळा जाणवू लागला होता. फोंडाघाट ओलांडून गोव्यात प्रवेश करताना कडक उन झाले. पणजीत हॉटेल बुक करून सर्वजण फ्रेश झालो. एव्हाना सायंकाळ झाली होती. आजची रात्र आराम करून उद्या साईट सिईंग करावे असे ठरवून मस्त ताणून दिली. सकाळी ताजे होऊन प्रथम गाठले ते बीच. मीरामार बीच. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उसळणारा विशाल सागर चांदण्यांसारखा रूपेरी वाळूचा किनारा. गोव्याच्या समुदाचे पाणी स्फटिकासारखे नितळ आहे. किनाऱ्यावर कित्येक परदेशी पर्यटक. समुदाच्या लाटांवर स्वार होण्याची इच्छा कुणाला होणार नाही? किनाऱ्यावर चौपाटीत मस्ती केली. किनाऱ्यावर बरेचसे ऐटदार घोडे उभे होते. साहजिकच माझ्यासकट आणखी दोन-तीनजणांना घोड्यावर बसून चौपाटी फिरण्याची इच्छा झाली. आयुष्यात पहिल्यांदाच घोड्यावर बसणार होतो त्यामुळे तशी उत्सुकता होतीच. (आमची लग्नाची वरात कारमध्ये झाली आहे बरं!) बाकी मित्र आपापल्या आवडीच्या घोड्यांवर बसले व रपेट मारायला निघून गेले. मी कमी उंचीचा घोडा निवडला, घोडेवाला दुसऱ्या एकाशी बोलण्यात गुंगला होता तोपर्यंत आपण बसून घ्यावे असा साधा विचार करून मी घोड्यावर मांड ठोकली अन जो घोडा उधळला. या अनपेक्षीत घटनेने माझ्या अंगाचा थरकाप उडाला. किनाऱ्यावरील पर्यटकांच्या गदीर्तून मार्ग काढत घोडा पळत सुटला आणि भीतीने मी अधिकच लगाम ओढत गेलो. घोडा आणखीनच वेग वाढवत गेला. तो एकदम समुदाच्या दिशेने वळाला अन पुढचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तो अगदी खोलवर घेऊन जात असताना आता आपण काही वाचत नाही असे समजून देवाचा धावा सुरू केला. तोच मोठी लाट आली अन तिच्याबरोबर आम्हीही किनाऱ्यावर आलो. चार पाच लोकांनी मला उचलून आणले मोठी गदीर् जमली. माझी स्थिती लक्षात न घेता जो तो मला घोडा कसा चालवायचा याचं नॉलेज देऊ लागला. एव्हाना माझे मित्र माझ्यापर्यंत पोहोचले होते. मला धीर देत होते. दहा-पंधरा मिनिटांचा तो थरार अजूनही माझा थरकाप उडवून जातो.
आमोल घायाळ ( मृगजळ ग्रूप मुंबई )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा