गुरुवार, १४ जुलै, २०११

धबधबे आणि अभयारण्याची सैर

पाऊस सुरू झाला निसर्गप्रेमींची पावलं आपोआप सह्यादीच्या पर्वतरांगांकडे वळतात. उंचावरुन कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचं वातावरण हे सारं अनुभवण्

यासारखं असतं. पावसाळ्यात दरवषीर् अनेक स्पॉट्स पर्यटकांनी गजबजतात. मात्र नेहमीच्या या ठिकाणांपेक्षा काही वेगळे स्पॉट्सही आहेत जिथे तुम्ही पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटू शकता.
.............

पावसाळ्यात पर्यटकांचे पाय रायगड जिल्ह्याकडे वळतात ते रायगडमधील डोंगरावरून कोसळणाऱ्या मनमोहक धबधबे पाहण्यासाठी व मस्त धबधब्याखाली ओलेचिंब होण्यासाठी. ही मजा काय औरच असते. वीकेण्डला रायगडमधल्या ताम्हाणी घाट, वरंध घाट, तसेच खोपोली, कर्जतपासून फणसाड (मुरुड) व अलिबागमध्येही पर्यटक फिरत असतात. मुंबईकरांना ताम्हाणी व वरंध घाट दूरचा असल्याने ते कर्जत, खोपोली तसेच अलिबाग व मुरुडकडील प्रदेशाला विशेष पसंती देतात. अलिबाग व मुरुडची ट्रीप म्हणजे 'डबल धमाका.' धबधब्यावरून ओलेचिंब होऊन यायचं आणि नंतर समुदावरच्या रेतीमध्ये निवांत बसायचं.

खोपोलीजवळील झेनिथचा धबधबा अलिकडे पर्यटकांना धोकादायक वाटत असल्याने अनेकजण त्याकडे पाठ फिरवत आहेत. मात्र याचवेळी कर्जत व खोपोली दरम्यान असलेल्या पळसदरी गावातील हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण होत चालला आहे. झेनिथपेक्षा हा धबधबा जवळ आहे. मुंबईहून खोपोली लोकल पकडल्यानंतर कर्जत स्टेशनच्या पुढील पहिले स्टेशन पळसदरी लागते. स्टेशनपासून दोन कि.मी. अंतरावर पळसदरी गावाच्या मागे डोंगराच्या कुशीत हा धबधबा आहे. पळसदरी स्टेशनवर जेवणाची सोय नसली तरी गावामध्ये राहण्याची व जेवणाची घरगुती व्यवस्था होते. चुलीवरच्या जेवणाची लज्जत पर्यटकांच्या आनंदात अधिकच भर घालते. धरणाकडे जाताना 'रेल्वेधरण' म्हणून ओळखलं जाणारं १९०५ सालचं ब्रिटिशकालीन धरण पर्यटकांचं लक्ष वेधून घेते. या धरणावरूनच गावाकडे रस्ता जातो. गावात विनंती केल्यास जेवणाची व्यवस्था केली जाते. अलिबाग व मुरुड येथील फणसाड अभयारण्यातील धबधबेदेखील पर्यटकांचे आकर्षण होत चालले आहे. अलिबागपासून ३० कि.मी. व मुरुडपासून २० कि.मी.वर असलेल्या फणसाड अभयारण्यातल्या धबधब्यांनाही पर्यटक भेट देतात. धबधब्यात भिजण्याच्या मजेबरोबरच अभयारण्याची सैर करता येते. तसेच मुरुड व काशीदच्या समुदकिनाऱ्यावरही भटकंती करता येते. फणसाडमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था विनंतीवरून होऊ शकते.


amol ghayal (mrugjal group)



भुशी डॅमवर तिकिटाशिवाय 'नो एन्ट्री'?



पावसाळा म्हटलं की तरुणाईच्या आनंदाला उधाण येतं आणि मग आपोआपच पावलं डोंगर-द-या , धबधबे , धरणांच्या दिशेनं वळतात. विकेण्डला चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई-पुणेकरांचं एक ‘ फेव्हरिट डेस्टिनेशन ’ म्हणजे , लोणावळ्याचा ‘ भुशी डॅम ’... परंतु , आता भुशी डॅमवर जाऊन पाण्यात डुंबण्यासाठी आता तिकीट काढावं लागणार आहे. कारण या धरणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचं रेल्वेच्या पर्यटन विभागानं ठरवलंय.

पावसाळ्यात आणि इतर सुट्टीच्या दिवशी भुशी डॅमला भेट देणा-या पर्यटकांची संख्या १० हजाराहून अधिक आहे. सकाळी लवकरात लवकर तिथे पोहोचायचं , धबधब्याखाली चिंब भिजायचं , मग डॅमच्या पाय-यांवरून वाहणा-या पाण्यात लोळायचं आणि रिफ्रेश होऊन संध्याकाळी घरी परतायचं , असा इथे येणा-या मंडळींचा दिनक्रम असतो. मुंबई-पुणेकरांचं भुशी डॅमवरचं हे प्रेम आयआरसीटीसीनं अचूक हेरलंय आणि एक उत्तम ‘ इन्कम सोर्स ’ म्हणून त्याकडे पाहायचं ठरवलंय. भुशी डॅमचा आनंद लुटण्यासाठी येणा-या पर्यटकांना तिकीट लावण्याचा त्यांचा विचार असून तसा प्रस्तावही मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आलाय.

भूशी डॅम हा इंग्रजांच्या काळात जीआयआरपी या रेल्वे कंपनीने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बांधला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात याची मालकी मध्ये रेल्वेकडे आली. या ठिकाणी येणारा पर्यटकवर्ग पाहता या जागेचा विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात काय पावलं उचलता येतील , याची संपूर्ण माहिती असलेला आराखडा मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आल्याचे रेल्वे पर्यटन विभागाचे संचालक विरेंद्र सिंग यांनी सांगितलं.

या संपूर्ण परिसरापैकी सुमारे २० हजार चौरस फुट जागेचा विकास करण्यात यावा , असं या प्रस्तावात सुचवण्यात आलं आहे. तसेच पर्यटकांना विश्रांतीसाठी तंबू उभारणं , पाण्यामुळे पाय-यांवर जमा होणारे शेवाळं साफ करणं , परिसर स्वच्छ ठेवणं , खाद्यपर्थांची सोय उपलब्ध करून देणं असे अनेक पर्यायही यात सुचवण्यात आले आहेत.

अद्याप हा प्रस्ताव कागदावरच असून या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरवायचा असल्यास काही कोटी रुपयांचा खर्च येईल , असे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले. परंतु ते या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करत असल्याचंही त्यांनी सूचित केलंय. हा प्रस्ताव संमत झाला तर भुशी डॅमचा परिसर चकाचक होईल , पण त्यासाठी पर्यटकांना स्वतःचा खिसा थोडा हलकाही करावा लागेल


amol ghayal (mrugjal group)

किल्ल्यांतली भटकंती


मान्सून म्हणजे हिरवाकं च निसर्ग...मान्सून म्हणजे मनसोक्त भिजणं...घरात बसून पाऊस कसा एन्जॉय करणार. मग ओघाने येतं ते ट्रेकिंग..पाऊसवेडे असलेल्या अनेक

कॉलेजिअन्सचे एकामागोमाग एक पिकनिक आणि ट्रेकिंगचे प्लॅन ठरलेलेच असतात. 'मान्सून म्हटलं की मला हिरवागार निसर्ग आठवतो. कधी एकदा धबधबे सुरू होतायंत आणि मी ग्रुपला घेऊन ट्रेकिंगला जातोय असं झालेलं असतं. कडक उन्हातून चालताना अचानक पावसाचा पहिला थेंब अंगावर पडतो, तेव्हाच मन चिंब भिजून कुठलातरी ट्रेक करून येतं, असं विद्यालंकार कॉलेजचा कौस्तुभ राणे सांगतो. त्यांच्या ग्रुपला शिवरायांनी बांधलेले गड-किल्ले फिरण्याचं वेड आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात त्यांना किल्ल्यांवरचे ट्रेक करायला आवडतं.

तो म्हणतो, 'राजमाची, रायगड, राजगड, कळसूबाई, आज्यापर्वत, कोथली, सज्जनगड असे एक ना अनेक किल्ले ही आमची पावसातली पहिली मोहीम असते. कधी आमचा ग्रुप तर कधी प्रॉपर ट्रेकही अरेंजही करतो. काही वर्षांपासून आम्ही प्रत्येक गड-किल्ल्याच्या ट्रेकमध्ये अनेक प्रकारची झाडं लावण्याचं उपक्रम राबवतो आहोत.पावसाळ्यातल्या या स्पेशल पिकनिकचा आणखी एक आवडणारा भाग म्हणजे उंच डोंगरावरची घरं, तिथल्या माणसांनी करून दिलेली गरमागरम भाकरी आणि सोबत तिखट चटणी, पिठलं किंवा मटण. मग काय...सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असू शकतं
..............

वडा गर्रम...

कर्जत स्टेशनला उतरलं की वड्यांचा

घमघमाट अनुभवला नाही आस्वाद घेतला नाही असा एकही प्रवासी नसेल. पावसाची मजा लुटायला जाणारा कोणताही ट्रेकर असू देत, दिवाडकरांकडचा वडा खाल्लाच पाहिजे. मान्सून पिकनिक आखणारा प्रत्येक ग्रुप आपल्या कार्यक्रमाच्या यादीत नाश्ता किंवा चक्क जेवण म्हणून दिवाडकरांचा वडा अॅड करतो. कर्जत स्टेशनला उतरल्यावर बाजारपेठेत चालत गेलं की काही मिनिटांच्या अंतरावर दिवाडकरांच्या वड्यांचं दुकानही आहे.

पाऊस सुरू झाला की प्रत्येक वीकेण्डला सुमारे शंभर-सव्वाशे लोक तरी कर्जतमध्ये दाखल होतात. धबधब्यांवर जाण्यासाठी बाजारपेठेतूनच रस्ता असल्याने दिवाडकर भेट ही ठरलेलीच असते. पावसाळ्यात इथे कायम गदीर् असते. सकाळी आणि संध्याकाळी ट्रेकर्स, फॅमिली हटकून येतातच. यामुळेच इतक्या वर्षांनंतर पाऊस आणि गरमागरम वाफा येत असलेला तिखट लसणाच्या चटणीबरोबर र्सव्ह केलेला वडा हे खास समीकरण अद्याप जुळलेलं आहे

amol ghayal (mrugjal group)


पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमण

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या ३५१व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना व त्यांच्या शूर सरदारांना मानवंदना देण्यासाठी 'भरारी' या गिर्यारोहण संस्थेने १

३ ते १६ जुलै या काळात पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेचं आयोजन केलं आहे. या मोहिमेला इतिहासतज्ज्ञ आप्पा परब यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. 'भरारी' संस्थेतफेर् गेली १२ वषेर् हा उपक्रम राबवला जात आहे. मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी मंदार खेडेकर ९७०२००१६६१, हर्षद जोशी ९८२१६३६२४३ किंवा राजेंद देशपांडे ९८६९४६२७४७ यांच्याशी संपर्क साधावा.
............

शिवशौर्य ट्रेकर्सचीही मानवंदना

शिवशौर्य ट्रेकर्सनेही पन्हाळगड-विशाळगड या मार्गावर १४ ते १७ जुलै या कालावधीत पदभ्रमणाचं आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०९३२०७५५५३९ / ०९८६९१०९९७०

ट्रेकचं आयोजन

' ट्री हिल ट्रेक'ने २६ जूनला एका ट्रेकचं आयोजन केलं आहे. या ट्रेकला येऊ इच्छिणाऱ्यांनी २५ जूनच्या रात्री ११.३० वाजता सीएसटी स्टेशनवर मुख्य इंडिकेटरजवळ जमायचं आहे. संपर्क : ९८९२४७३४९७ ९८६९३८५५३१



amol ghayal (mrugjal group)

ट्रेक



पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं. भुरभरता पाऊस कोसळत असताना दऱ्याखोऱ्यांतून हिंडणं हा अनुभव एकदम आगळावेगळा ठरतो. पहिला पाऊस पडून ग

ेला की अस्सल ट्रेकर्सना ट्रेकिंगचे वेध लागतात. ट्रेकिंग प्लॅन आखणाऱ्या संस्था विविध ठिकाणी ट्रेक्स आखत असतात. तुम्ही जर पहिल्यांदा ट्रेकिंगला जाणार असाल तर काही गोष्टी मात्र नीट लक्षात ठेवायला हव्यात.

> आपण कोणत्या ग्रुपबरोबर जातो? या क्षेत्रामध्ये त्यांना किती वर्षांचा अनुभव आहे तसंच त्यांच्याकडे किती अनुभवी गिर्यारोहक आहेत याची माहिती आधी करून घ्यावी.

> शक्यतो एकच दिवसाच्या ट्रेकला जावे. त्या अनुभवानंतर मग दोन-तीन दिवसांच्या ट्रेकला जावं.

> आपण ज्या ट्रेकला जाणार आहोत, त्या ठिकाणाची माहिती अगोदर करून घ्यावी. ठिकाणाचं नाव, तिथलं जवळपासचं गाव, पोलीस स्टेशन कुठे आहे ते जाणून घ्या.

> ज्या ठिकाणी जाणार तिथे किती तास चालावं लागणार आहे याची माहिती अगोदर करून घ्यावी.

> आपण पावसाळी ट्रेकला जाणार आहोत, पिकनिकला नाही याचं भान जरुर ठेवा.

> ट्रेकिंगला जाताना रकसॅक मध्ये प्लास्टिकची पिशवी टाकून, त्यानंतरच त्यामध्ये कपडे व इतर सामान भरा.

> एक जोडी जास्तीचे कपडे, एकवेळचं जेवण, वॉटर बॉटल, ताट वाटी, ग्लास, टॉवेल, नॅपकिन, टॉर्च, स्वत:ला लागणारी औषधं, स्लीपर व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून सॅकमध्ये ठेवावं.

> पावसाळ्यात निघणार असल्याने छत्री, रेनकोट सोबत असू द्यावंच.

> कोणतेही स्पोर्टस् शूज, ट्रेकिंगचे शूज घालूनच ट्रेक करा.

> जास्तीची प्लास्टिकची पिशवी सोबत ठेवावी. भिजलेले ओले कपडे ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

> आयोजकांपैकी चार-पाच जणांचा मोबाईल नंबर, ट्रेकची माहिती, ट्रेकवरून कधी घरी परतणार याची माहिती कुटुंबियांना अवश्य द्यावी.

> ग्रुप लीडर, आयोजकांच्या जे सांगेल त्या आदेशाचं पूर्ण पालन करावं.

> ट्रेकला सर्वात पुढे लीडर असतो, त्याच्या पुढे जायचं नाही तसंच सर्वात शेवटीही राहायचं नाही हे लक्षात असू द्या.

> स्वत:हून नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न कधीच करू नका.

> चालताना एक-दुसऱ्याला ओव्हरटेक करू नका.

> वाटेतले नदी-नाले ओलांडताना, लीडरच्या आदेशाचंच पालन करा. अतिसाहस बिलकूल करू नका. नदी लहान असली तरी प्रवाहाच्या वेगाने वाहून जाण्याची भीती असते.

> पोहता येत नसेल तर पाण्यात उतरू नये. आणि येत असेल तरी अतिआत्मविश्वासाने वावरु नका.

> डोंगर चढतांना छोटी झुडूप, किंवा दगडांना पकडतांना विशेष काळजी घ्यावी. ते कधीही निसटण्याची शक्यता असते. म्हणून त्याचा आधार घेऊन चढू नये.

> ट्रेकला जाताना फुल पॅन्ट (ट्रॅक पॅन्ट), फुल हाताचे कपडे घाला. बर्मुडा हाफ पॅन्ट घालू नये.

> दागिने / मौल्यवान वस्तू बिलकूल जवळ बाळगू नका.

> कॅमेऱ्याची विशेष काळजी घ्या. फोटोग्राफी करतांना वेळेचं भान ठेवा.

> ऐतिहासिक वास्तूंना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नका. अशा ठिकाणी कुठेही आपलं नाव लिहू नका.

> कोणतंही व्यसन-मद्यपान, सिगरेट ओढणं, तंबाखू-गुटखा खाणं टाळा.

> चॉकलेटचे रॅपर, बिस्किट-वेफर्सची रिकामी पिशवी, प्लास्टिकची रिकामी बाटली, थंड पेयांची रिकामी डबे (टिन) ट्रेकच्या वाटेवर टाकू नका. खाऊन झाल्यावर या गोष्टी स्वत:च्या सॅकमध्ये ठेवावा. ट्रेक संपल्यावर ते कचरापेटीत टाका. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचेल असं काहीही करू नका.

> चालताना किंवा संपूर्ण ट्रेकमध्ये मोबाईलवर गाणी लावू नका. कोणतंही ध्वनी प्रदूषण नको.

> हृदयरोगी, दम्याचे रोगी यांनी शक्यतो ट्रेकला जाऊ नये. आपल्या आजारांविषयी आयोजकांना माहिती द्यावी.

> ट्रेक संपल्यावर ओले शूज काढून, स्लीपर्स घालावेत. अन्यथा ओल्या शूजमुळे पायाला ब्लिस्टर होण्याची शक्यता असते.

> ट्रेकला चालताना एकमेकांशी बोलण्यापेक्षा डोळे-कान उघडे ठेवून पशू-पशी, फुलं-झाडं यांचं निरीक्षण करा.

> ट्रेकसाठी ज्या गावात जातोय तिथल्या गावकऱ्यांशी ओळख करून घ्या. त्यांच्याशी सौहार्दाने वागा.




amol ghayal (mrugjal group)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा